महाप्रसाद कार्यक्रमाने तथागत गौतम बुद्ध जयंती थाटात साजरी…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

कन्हान : – जवाहर नगर मित्र परिवार द्वारे विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्य महाप्रसाद वितरण कार्यक्र माने वैशाख बुध्द पोर्णिमा व तथागत गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.  

             नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील जवाहर नगर ये़थे महाप्रसाद वितरण कार्यक्रमा स प्रामुख्याने उपस्थित सामाजिक कार्यकर्ता गौरव माहोरे यांचा हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

          वैशाख बुध्द पोर्णिमा व तथागत गौतम बुध्द जयंती कार्यक्रमा स उपस्थित बांधव आणि येणा-या जाणा-या प्रवाश्या ना महाप्रसाद वितरण करुन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

         याप्रसंगी गौरव माहोरे, उमेश मोटघरे, सुधीर धनविजय, कैलास गेडाम, रविंद्र (गबर )कुंभारे, दीपक कुंभारे, सागर उके, काका नारनवरे, निशांत मोटघरे, राजा चहांदे सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.