जीवन आधार सामजिक संस्थेला 2023 चा विदर्भ भूषण पुरस्कार सन्मानित…. — फिल्म अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रदान… — अनेक मान्यवर च्या उपस्थित कन्या प्राणांगणात करण्यात आले होते आयोजन…

रत्नदिप तंतरपाळे/चांदूर बाजार तालूका प्रतिनिधी

     जीवन आधार सामजिक संस्था संस्थापकअध्यक्ष जीवन जवंजाळ यांनी सुरू केलेल्या जीवन आधार संस्थेला उत्कृष्ट समाजसेवक म्हणून कन्या हायस्कूल दर्यापूर येथे फिल्म अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या हस्ते विदर्भ भूषण 2023 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचे आयोजन विदर्भ केसरी या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते या पुरस्कारासाठी विदर्भातील 10 व्यति ना निवडण्यात आले होते त्या मधून दिवस रात्र आपल्या सेवेतून गोर गरीब अपंग अनाथ बेघर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब अश्या सर्वासाठी आपल्या संस्थे माध्यमातून सेवा देणारे संस्थापकअध्यक्ष जीवन जवंजाळ व त्यांच्या सर्व सदस्य यांना समर्पित करण्यात आला जीवन आधार संस्थेने आता पर्यत कित्येक परिवार यांना आधार दिला आहे रुग्णवाहिका च्या माध्यमातून कित्येक परिवार यांचे प्राण वाचवले आहे व चांदुर बाजार तालुक्यातील गोर गरीब परिवार साठी मोफत फिरता दवाखाना ची सुरुवात केली आहे अश्या महान संस्थेला विदर्भ केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून 2023 चा विदर्भ भूषण पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार अनेक मान्यवरच्या उपस्थित प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोंबडी पडाली फिल्म अभिनेत्री क्रांती रेडकर, आमदार बळवंत वानखडे, संध्याताई सव्वालाखे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुंबई, सुधाकरराव भारसाकळे अध्यक्ष जिल्हा मध्य बँक, तू तिथे असावा फिल्म निर्माता गणेश पाटील, डॉ डी एम भांडे माजी मंत्री, गणेश जाधव क्रीडा अधिकारी बुलडाणा, गजानन कोरे, विजय विल्हेकर, जेष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख, अमोल कंटाळे मुख्य संपादक विदर्भ केसरी आदी मान्यतावर व नागरिक उपस्थित होते