राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वन विभागामार्फत वन व वन्यजीव व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वनरक्षक श्री. मुकेश सय्याम यांना राज्यस्तरीय रजत पदक जाहीर करण्यात आले आहे. वनसंरक्षणाच्या प्रभावी कार्याबाबत आणि वन सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हे वन खात्याचे प्रतिष्ठित पदक मिळाले आहे.
श्री. मुकेश सय्याम हे मूळचे कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील रहिवासी आहेत. सध्या ते चारभट्टी येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समर्पित सेवेमुळे स्थानिक जंगलांचे संरक्षण, वन्यजीव व्यवस्थापन आणि वन विभागाच्या विविध उपक्रमांना चालना मिळाली आहे.
वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले असून, “अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळे वनसंरक्षण कार्य अधिक प्रभावी होत आहे,” असे मत व्यक्त केले.
मुकेश सय्याम यांनी या यशाबद्दल आपल्या कुटुंबीयांचे, सहकाऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले. त्यांनी पुढील काळातही वनसंरक्षणासाठी अथक प्रयत्न करण्याचे मत व्यक्त केले.



