Home Maharashtra अशोक खरात प्रकरणाच्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा मोठा निर्णय!….

अशोक खरात प्रकरणाच्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा मोठा निर्णय!….

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादिका 

          नाशीक जिल्ह्यात घडलेल्या गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्या विरोधात दररोज नवे खुलासे समोर येत असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. 

       अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.या प्रकरणाची दखल घेत सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याच्या प्रमुख IPS अधिकारी तेजस्वी सातपुते आहेत.

             त्यांनी नागरिकांना आवाहन करत या प्रकरणाशी संबंधित माहिती असल्यास पुढे येण्याचे आणि पीडितांनी निःसंकोच तक्रार करण्याचे सांगितले आहे.

         तसेच ओळख गोपनीय ठेवली जाईल असे आश्वासन दिले आहे. SIT मध्ये किरणकुमार सूर्यवंशी,तृप्ती सोनवणे आणि राहुल मोरे या अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी संपर्कासाठी मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत.

           अशोक खरात प्रकरणात तक्रार करण्यासाठी तसेच माहिती देण्यासाठी ९५०३२७०२२४ आणि ७७७५८१६३८९ हे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत.आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले असून तपास वेगाने सुरू आहे.

        परंतु भीतीमुळे अनेक महिला पुढे येत नसल्याचे दिसत आहे.दरम्यान,विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही असे स्पष्ट करत सविस्तर निवेदन देण्याची घोषणा केली आहे.