1. विरोध स्वतःसाठी की दुसऱ्यासाठी?
2. विरोध स्वतःसाठी की कुटुंबासाठी?
3. विरोध स्वतःसाठी की समाजासाठी?
4. विरोध स्वतःसाठी की गावासाठी?
5. विरोध स्वतःसाठी की देशासाठी?
6. विरोध स्वतःसाठी की जगासाठी?
7. विरोध,विकासासाठी की विकासालाच?
वरील प्रश्नांच्या उत्तरातच विरोधाचा हेतू स्पष्ट होतो. विकासाला विरोध करण्याचा हेतू हा मागासलेपणाकडे नेतो. आणि विकास करण्यासाठी किंवा विकास होण्यासाठी केलेला विरोध हा प्रगती कडे घेऊन जातो.यासाठी हेतू हा विकसित असला पाहिजे.
हेतूची कक्षा व्यापक असली पाहिजे संकुचित असता कामा नये.संकुचित विचारातून विरोधाला विकास होतो आणि व्यापक विचारातून विकासासाठी विरोध होतो,विकासाला विरोध नसतो.
याकरता लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्त्व अनन्य असे आहे.लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर,विकास हा सही दिशेने जाईलच याची शाश्वती देता येत नाही.
तसेच विकास करताना सत्ताधारी पक्षाचा हेतू जर वाईट किंवा चुकीचा असेल किंवा सारथी असेल तर त्याला लगाम घालण्याचे काम विरोधी पक्ष करीत असतो,विरोधकांचा विकासाकडे नेण्याच्या उद्देशाने केलेला विरोध हा विकासाला पूरकच ठरतो. आणि जर विरोध काढणे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विकासाला विरोध करीत असतील तर तेही विकासाला विरोधच ठरतो.
याचा अर्थ विकासाला विरोध करणे किंवा विकासासाठी विरोध करणे यातील हेतू हा महत्त्वाचा आहे.हेतू हा सकस आणि शुद्ध पाहिजे. तरच विरोधाला धार येते.आणि सत्ताधारी पक्षाला विरोध मान्य करावाच लागतो.
परिवर्तन बदल विकास हा विरोधातूनच होत असतो. संघर्षातूनच होत असतो.संघर्ष हा विरोधातून निर्माण होतो.संघर्षातून आणि विरोधातून निर्माण झालेली परिस्थिती आणि विकास हाच खरा विकास असतो.
मात्र संघर्ष किंवा विरोधात चा हेतू हा स्पष्ट, स्वच्छ,पारदर्शी,शुद्ध,पवित्र म्हणजेच व्यापक असला पाहिजे,विरोधात आहे तो हा संकुचित असता कामा नये.
कुटुंबाला,समाजाला, गावाला,देशाला,विश्वाला सोडून म्हणजेच त्यांना गृहीत न धरता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला विकास म्हणजेच शोषण,पिळवणूक,अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार, नफेखोरी,दलाली,जुवाबाजी होय.समाजाची फसवणूक होय.या सर्व गोष्टी करणे म्हणजे विकासाला विरोध करणे होय.
चांगल्या आणि वाईटाचा अंतर्मनातील संघर्ष,आणि बहुतेक संघर्ष म्हणजेच विरोध यातूनच विकास होत असतो.यासाठी कुणाच्या मदतीची किंवा बहुमताची गरज नसते. शुद्ध हेतूचा पाया म्हणजे सत्य होय.
सत्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नसते.म्हणून विकासातील सत्य जाणून घेणे आणि त्यासाठी विरोध करणे संघर्ष करणे हे महत्त्वाचे आहे.
याचा अर्थ विकासाला विरोध करणे नव्हे तर विकासासाठी विरोध करणे हा हेतू असला पाहिजे.यालाच विरोध विकास म्हणतात किंवा विरोधी विकासाचा सिद्धांत,असे म्हटले जाते.
विरोध विकास सिद्धांत म्हणजेच,दोन हे तुमचा संघर्ष, दोन विचारातील विरोध,व्यक्तिगत पातळीवरील अंतरिक विरोध आणि बहुतेक पातळीवर भौतिक विरोध,असे विरोधाचे दोन प्रकार आहेत.
दोन विचारांचा संघर्ष आणि हेतूचा संघर्ष म्हणजेच विरोध होईल.या विरोधातील दोन विचार किंवा दोन हेतू यांची तपासणी होणे गरजेचे आहे.
त्या तपासणीत या दोन विचारापैकी ज्या विचारात शुद्धता पवित्रता आणि व्यापकता आहे ते विचारच नवीन काहीतरी निर्मिती करू शकतात. त्यातून विकासाची दिशा पण स्पष्ट होते. आणि विकासाची व्याख्या पण निश्चित होते.
आणि येता का विकास म्हणजे काय,विकासाची व्याख्या,आणि विकास कोणत्या दिशेने जायला पाहिजे किंवा गेला पाहिजे,याची स्पष्टता येणे गरजेचे आहे.
यावरूनच माणसाचे,कुटुंबाचे,समाजाचे,देशाचे,विश्वाचे भवितव्य ठरत असते.



