Home सांस्कृतिक शिखर शिंगणापूरला चैत्री वारीसाठी जाणारी शंभू महादेव मानाच्या धजदिंडीचे पिंपरी बुद्रुक येथे...

शिखर शिंगणापूरला चैत्री वारीसाठी जाणारी शंभू महादेव मानाच्या धजदिंडीचे पिंपरी बुद्रुक येथे उत्साहात स्वागत व पूजन सह आरतीही केली. 

    बाळासाहेब सुतार 

निरानरसिंह तालुका प्रतिनिधी 

पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे सालाबाद प्रमाणे– शिखर शिंगणापूरला जाणाऱ्या शंभू महादेव मानाच्या धजदिंडीचे स्वागत व पूजन केल्यानंतर समाधान बोडके यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

         खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यथुन शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा या ठिकाणी जाणारी मानाची धज दिंडीची परंपरा आजही चालूच असून. मनोभावाने प्रत्येक गावोगावी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आनंद घेतला जातो. 

           लोकनेते कैलासवाशी महादेवराव बोडकेदादा विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा सुभद्राबाई बोडके व मा.ग्राम पंचायत सदस्य समाधान बोडके परिवाराच्या वतीने पिंपरी बुद्रुक येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात धज दिंडी समवेत आलेल्या सर्वांचे स्वागत करण्यात आले. 

         या धार्मिक सोहळ्याला पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक आणि धज दिंडीचे मानकरी विलास ढवन महाराज सह त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात धजदिंडीचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, भगवे पताकांचे आकर्षक सजावट आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

          बोडके परिवाराच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. आलेल्या धज दिंडी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेत धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले.

         धजदिंडीच्या या कार्यक्रमामुळे पिंपरी बुद्रुकमध्ये भक्ती, श्रद्धा आणि पारंपरिक वैभवाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.