Home देशविदेश भारताचे मुख्य न्यायाधीश झाले सुर्यकांत… — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली...

भारताचे मुख्य न्यायाधीश झाले सुर्यकांत… — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली त्यांना पद व गोपनीयतेची शपथ…

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

         भारताचे ५३ वे मुख्य न्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ दिली.

             याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,भारताचे माजी मुख्य न्यायाधीश भुषण गवई,भारताचे गृहमंत्री अमित शहा,संरक्षण मंत्री राजनाथसिंह,इतर मंत्री व मान्यवर उपस्थित होते.

         शपथविधी सोहळा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगान झाले व शपथविधी सोहळा पार पडल्यानंतरही राष्ट्रगान झाले.

        भारताचे मुख्य न्यायाधीश सुर्यकांत यांचा कार्यकाळ हा संविधानाच्या चौकटीत असणार की चौकट बाह्य असणार हे भारतीय नागरिकांना अनुभवाला येणार आहे.