शिवाजी पार्क मैदानावर वंचित बहुजन आघाडी द्वारा उद्याला विशाल,”संविधान महासन्मान,सभा… — काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी येणार?

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

           वृत्त संपादीका

           भारतीय संविधान म्हणजे या देशाचे तमाम नागरिक आणि तमाम नागरिक म्हणजेच भारतीय संविधान!..

          अर्थात मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्या होत असलेली संविधान महासन्मान सभा म्हणजे या देशातील तमाम नागरिकांची महासन्मान सभा होय.

        एवढेच काय देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय संविधान महासन्मान सभेचे होणारे आयोजन सुध्दा देशातील नागरिकांच्या महासन्मान सभा होत.

         देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा कारभार चालविण्यासाठी सर्वमान्य व सर्व समावेशक राज्य घटना आवश्यक होती.अशीच राज्य घटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड बौध्दिक क्षमतेनुसार व श्रमानुसार,”संविधान मसुदा समिती सदस्यांच्या अभ्यासपूर्ण चर्चाअंती,”भारतीय संविधान,तयार करण्यात आले व २६ नोव्हेंबर १९४९ ला तात्कालिक राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतीय संविधान स्विकारण्यात आले आणि २६ जानेवारी १९५० लागू करण्यात आले.

          भारतीय राज्यघटने या देशातील तमाम नागरिकांना मुलभूत अधिकार व बाह्य मुलभूत अधिकार दिले आहेत.तद्वतच निवडणूकातंर्गत मतदारांना मतदानाच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारे बनविण्याचा महत्वपूर्ण अधिकार सुध्दा राज्य घटनेंनी दिला.

***

देशातील नागरिकांना भारतीय राज्यघटने दिलेले खालीलप्रमाणे अधिकार..

            बोलण्याचा अधिकार,भाषण देण्याचा अधिकार,लिहिण्याचा अधिकार,शिक्षणाचा अधिकार,व्यापार करण्याचा अधिकार,राष्ट्रपती व राज्यपाल होण्याचा अधिकार,खासदार-आमदार-प्रधानमंत्री-केंद्रीय कॅबिनेट मंत्री-केंद्रीय राज्यमंत्री-मुख्यमंत्री, राज्यस्तरीय कॅबीनेट मंत्री-राज्यस्तरीय राज्यमंत्री होण्याचा अधिकार,सर्व प्रकारच्या कार्यालयातंर्गत अधिकारी व कर्मचारी होण्याचा अधिकार, न्यायमूर्ती होण्याचा अधिकार,शेती करण्याचा अधिकार,धनसंचय करण्याचा अधिकार,स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार,घर बांधण्याचा व तिथे राहण्याचा अधिकार,रोगमुक्त सुखमय जिवन जगण्याचा अधिकार,उपचार करण्याचा अधिकार,अन्न आणि वस्त्रांचा अधिकार,समानतेचा अधिकार,बंधुत्वाने वागण्याचा अधिकार,स्वातंत्र्याने राहण्याचा अधिकार,न्याय मागण्याचा अधिकार,सुट्टीचा अधिकार,वाढीव व महागाई भत्ता अधिकार,देशात कुठेही राहण्याचा व राहत असलेल्या ठिकाणी रोजगार करण्याचा अधिकार,व इतर सर्व प्रकारचे अधिकार भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आले आहेत.

***

म्हणूनच…

         भारतातील सर्व नागरिकांना भारतीय संविधानाने समप्रमानात अधिकार दिलेले असल्यामुळेच या देशातील मनुवादी विचारसरणीचे लोक नेहमी,”भारतीय संविधानाचा,विरोध करतात व संविधानाला बदलवण्याची भाषा वापरतात.

          भारतीय संविधान आहे तर या देशातील नागरिकांचे अधिकार आहेत.भारतीय संविधान बदले गेले तर या देशातील तमाम नागरिकांचे अधिकार कायमचे खत्म होतील.परत जूनीच परंपरा सुरु होईल.

      संभाव्य धोके लक्षात घेता भारतीय संविधान म्हणजे नेमके काय? हे देशातील सर्व नागरिकांना सांगणे आवश्यक झाले आहे.

***

उद्या विराट महासंविधान सभा..

        वंचित बहुजन आघाडीच्या वतीने,”भारतीय संविधान महासन्मान सभेचे आयोजन,मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आले आहे.

          महाराष्ट्र राज्यातंर्गत,” संविधान महासन्मान सभा,”न भूतो न भविष्यती,होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

            महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीची जन ताकद ध्येय निष्ठ असल्याने, राज्यातंर्गत गावखेड्यातून या सभेला प्रचंड प्रमाणात नागरिक हजेरी लावणार आहेत..

**

खासदार राहुल गांधी…

        संविधान महासन्मान सभेला खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी,त्यांना पत्र पाठविले आहे.

       मात्र कांग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे मुंबई येथे उद्या होणाऱ्या संविधान महासन्मान सभेला उपस्थित राहणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.