एकोडी येथे आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने ११४ शहीद बांधवांना श्रद्धांजली…

    ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने ११४ शाहिद बांधवांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 

         त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सदस्य वैभव खोब्रागडे, सदस्या कुंदाताई जांभूळकर, माजी विस्तार अधिकारी विजय भूरे, कार्तिक मेश्राम, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश नेवारे, उपाध्यक्ष क्रीष्णा नेवारे, सचिव नरेश चौधरी, मार्गदर्शक सुभाष चचाने, पद्माक्ष गजबे, दिनेश गुरबेले उपस्थित होते

     सुरुवातीला शाहिद स्तंभाचे पूजन करून 114 शाहिद बांधवांना श्रद्धांजली देण्यात आली.तसेस वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले नंतर उपस्थित वैभव खोब्रागडे, विजय भुरे यांनी आदिवासी शाहीद बांधव यांच्या विषयी मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष भावेश कोटांगले शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून विस्तृत अशी माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली. 

 कार्यक्रमाचे संचालन व आभार उपसरपंच रिंगण राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व आदिवासी गोवारी संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधव व महिलांनी सहकार्य केले.