पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी वडसा/देसाईगंज
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदास मसराम सर यांचा दि. २२ ऑगस्ट २०२५ ला वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्ते व मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपन, फळवाटप व देसाईगंज येथील माता वार्ड येथील माता मंदिरच्या सभागृहात रक्तदान करून आमदार मसराम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
यावेळी तब्बल ५६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केल्याने आ.रामदास मसराम यांनी त्यांची दखल घेत भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सणउत्सव असलेल्या दिवाळी निमीत्याने भाऊबिजेच्या दुसऱ्याच दिवशी दि. २४ ऑक्टोंबर २०२५ रोजी आपल्या राहते निवासस्थानी रक्तदात्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
रक्तदात्यांनी कोणत्याही रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून समाजसेवा करणे गरजेचे आहे. रक्तदान हे महानदान असून गरजु नागरिकांसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान हे मानवतेच्या हिताचे कार्य करण्याची मानवाला मिळालेली एक अमुल्य संधी आहे. सध्या रक्तदान हे काळाची गरज बनले असुन बदलत्या जीवनशैलीमुळे समाजात विविध आजारांचे वाढणारे प्रमाण, वारंवार होणारे अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण यामुळे रक्ताला खुप मागणी असते. पण त्या प्रमाणात मात्र रक्तपुरवठा फार कमी प्रमाणात होतांना दिसुन येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज आज निर्माण झाली असुन रक्तदानाच्या या महाचळवळीत सर्वांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केले.
यापुढेही रक्तदात्यांचा सत्कार सुरू राहणार असे मत आ.मसराम यांनी प्रस्तृत प्रतिनिधीला दिले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी नगरसेवक गणेश फाफट, धनपाल मिसार, माजी पंचायत सभापती केतू गेडाम आरमोरी, पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, माजी नगरसेवक शरद मुळे, विक्की रामानी, राजेंद्र बुल्ले माजी सरपंच सावंगी, कमलेश बारस्कर, वैभव मेश्राम, अजय मोहुर्ले, परशुराम ठाकरे, सागर वाढई, विकास प्रधान, हंसराज लांडगे, सोनू चावला, भुमेश्वर शिंगाडे, लंकेश ढोरे, रेशीम प्रधान यासह बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होते.



