भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव येथे दिनांक 24 जून 2025 रोज मंगळवार ला आनंद तुकाराम दखने राहणार रेगेगाव याला 37500/- रूपयांचा धनादेश देण्यात आले.
काही दिवसांपूर्वीच दिनांक 01/05/2025 ला आनंद तूलाराम दखने मौजा रेगेगाव येथील त्याचे पाळीव प्राणी जर्सी गाय ला बिबट्याने जंगलात जागीच ठार जिवंत मारले होते आणी लगेच त्वरीत आनंद तूलाराम दखने यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव यांना याची परिपूर्ण सूचना दिली होती व लगेच या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव यांनी दखल घेऊन त्वरीत कार्यवाही केली आनी एक महिन्याचा आत धनादेश धारकाला 37500/- ₹ धनादेश चेक च्या स्वरुपात देण्यात आले!
या धनादेश वाटप कार्यक्रमात माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे व वनपरिक्षेत्र अधिकारी सौ.कराडे मॅडम वनपरिक्षेत्र कार्यालय पक्षिम मुरुमगाव व क्षेत्रसाहायक बेहरे, क्षेत्र साहाय्यक उसेंडी, क्षेत्र साहाय्यक बोरकूटे वनरक्षक रायसिडाम व तालूका पत्रकार मो.शरीफ कूरैशी धानोरा व धनादेश धारक आनंद तुकाराम दखने यांनी आपली उपस्थित होते.


