Home Maharashtra शेवटची घटका मोजत असलेल्या जि.प.शाळा वाचविण्यासाठी सायत ग्रा.पं.चा पुढाकार, जि.प.शाळेसाठी पुढाकार घेणारी...

शेवटची घटका मोजत असलेल्या जि.प.शाळा वाचविण्यासाठी सायत ग्रा.पं.चा पुढाकार, जि.प.शाळेसाठी पुढाकार घेणारी सायत ग्रा.पं.जिल्ह्यात पहिली…

युवराज डोंगरे/खल्लार

         उपसंपादक 

      ग्रामिण भागातील जि. प. शाळा या कमी पटसंख्येअभावी दिवसेंदिवस बंद पडत चाललेल्या आहेत. जि. प. शाळेकडे पालकांचा कल कमी असून या शाळा बंद पडू नये यासाठी भातकुली तालुक्यातील सायत ग्रामपंचायतने पुढाकार घेतला असून गावातील जोही पालक त्यांच्या पाल्यांचा जि. प. शाळेत प्रवेश घेईल त्या पालकांचा घरपट्टी कर, पाणी पट्टी कर माफ करण्यात येईल.

        असा महत्वपूर्ण निर्णय सायत ग्रामपंचायतने घेतला असून हा निर्णय घेऊन जि. प. शाळा वाचविण्यासाठी पुढाकार घेणारी सायत ग्रामपंचायत ही अमरावती जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया 

       सायत ग्रामपंचायतची लोकसंख्या ही चार हजार असून 9 ग्रामपंचायत सदस्य आहेत. जि. प. शाळा बंद पडू नये यासाठी आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.

सौ.अन्नपूर्णा ज्ञानेश्वर मानकर 

सरपंच ग्रा. पं. सायत ता. भातकुली