Home Maharashtra यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊली जेजुरीत दाखल… – राजा तिथला...

यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात माऊली जेजुरीत दाखल… – राजा तिथला मल्हारी,आली त्याच्या दारी माऊलींची वारी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पुणे : राज्यभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह आहे. अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीनगरीमध्ये दाखल झाली आहे. श्री खंडेरायाच्या नगरीमध्ये माऊलींच्या पालखीला हळद लागली आहे. गावामध्ये पालखीचे दिमाखदार स्वागत झाले. यावेळी गावकऱ्यांनी माऊलींच्या रथावर बेल भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.

      ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं दिमाखात जेजुरीत स्वागत करण्यात आलं. जेजुरीकरांनी पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली. दरवर्षी प्रमाणे मोठ्या संख्येने जेजुरीकर पालखीच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. 

       “सासवडमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सकाळी साडे सातच्या सुमारास पालखीने जुजेरीचा रस्ता धरला. सासवडवरुन निघाल्यानंतर पालखीने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जेजुरीमध्ये प्रवेश केला. जेजुरी नगरीत प्रवेश केल्यानंतर खंडोबा देवस्थान आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने रथावर भंडाऱ्याची उधळण करीत स्वागत करण्यात आले.

       यावेळी संपूर्ण पालखी सोहळ्या हळदीमध्ये न्हाऊन गेला होता. हे दृश्य अगदी विहंगम होते. ऐतिहासिक होळकर तलावाकाठी असलेल्या पालखी तळावर समाज आरती करण्यात आली.