शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर:- सामाजिक साहित्यिक शैक्षणिक क्रिडा व कला क्षेत्रातील महिला व तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं सखी मंचच्या मुख्य संयोजिका पदी चद्रपूरातील अँड.सरिता नारायण टेंभरे यांची नागपूरच्या योग शिक्षिका तथा समाजसेविका माया कोसरे यांनी आज नियुक्ती केली आहे.
त्या मुळच्या वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सोनेगांव येथील रहिवासी,प्राथमिक शिक्षण त्यांनी सरकारी शाळेत केले.सरस्वती हायस्कूल मध्ये त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण घेतले.त्यानंतर पुढील शिक्षण चंद्रपूरच्या एसपी कॉलेज मधून त्यांनी पूर्ण केले.कुटुंबातील संस्कार व उच्च शिक्षणाची आवड,यामुळे त्या आज वकील झाल्या समाजसेवा करण्याची त्यांना आवड आहे.
सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोलाचा वाटा असतोय.त्या एक प्राणीप्रेमी आहे हे विशेष!
सहज सुचलं सखी मंचच्या संयोजिका पदी निवड झाल्या बद्दल सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे,सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते,सुपरिचित कवयित्री शैला चिमड्यालवार,डॉ.सुचिका बुक्कावार,अँड.अंजली गुंडावार,संजीवनी धांडे,समाजसेविका रजनी रणदिवे,सिमा पाटिल,जेष्ठ साहित्यिक विजया भांगे,विजया तत्वादी,या शिवाय सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक,सहसंयोजिका नलिनी आडपवार,कवयित्री विद्या पिंजरकर,कविता जुमडे,चैताली आत्राम,अपर्णा चिडे,वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे,प्रख्यात रांगोळी आर्टिस्ट साक्षी वाटगूरे,अंजली इटनकर,चंदा कामडी,सहज सुचलंच्या प्रसिद्धी प्रमुख प्रविणा वाघाडे, कविता दिकोंडवार,प्रांजू मखरे,संगित विशारद रश्मि हिवरे,चित्रकार रश्मि पचारे,नूपुर मोडक, महिला पत्रकार स्नेहा मडावी,हेमा भडके,आदींनी अँड सारिका टेंभरे यांचे अभिनंदन केले आहे.



