भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी धानोरा तालुका तर्फे धानोरा शहरात वारंवार वीज खंडित होणे व महामार्गाच्या कामात होत असलेले दुर्लक्ष याबाबत आज महावितरण व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांसोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी, समस्या व उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये महावितरण तर्फे अभियंता जांभुळकर व शाहू उपस्थित होते तर राष्ट्रीय महामार्गतर्फे अतुल श्रीवास्तव व झा यांनी उपस्थित राहून आवश्यक त्या सूचना ऐकून घेतल्या व लवकरात लवकर त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.



