Home शैक्षणिक शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी शालेय साहित्यांचे वाटप… — समाजसेवक जितेशदादा कुळमेथेंचा पुढाकार…...

शाळा प्रवेशोत्सवाच्या दिवशी शालेय साहित्यांचे वाटप… — समाजसेवक जितेशदादा कुळमेथेंचा पुढाकार… — विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फूलले… — दादांनी केले शालेय विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे चंद्रपूर शहरातील युवा व तडफदार नेते जितेशदादा कुळमेथे यांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील इंदिरा नगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सेमि.इंग्रजी शाळा ,संजय नगर मधील जय लहरी काॅन्हेंट, जगन्नाथ बाबा विद्यालय, प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा,एम ई एल येथील राणी राजकुवर प्राथमिक शाळा,शहिद भगतसिंह प्राथमिक शाळा,एम. बी.माॅडेल प्राथमिक शाळा कृष्णा नगर व स्व. बापूराव वानखेडे विद्यालय संजय नगर येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले.एव्हढेच नाही तर जितेशदादांनी पार पडलेल्या कार्यक्रमातून शाळेत नियमित या ! शिक्षण घेवून मोठे व्हा व अधिकारी बना! असा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून या वेळी दिला.

          शाळेचा काल पहिला दिवस होता. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले.

     शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापकसह शालेय शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.

      शालेय साहित्य बघून विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हास्य फूलल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते.

      काही कार्यक्रमाला शालेय विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

      सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला आत्माराम खैरे,प्रलय सरकार, समाजसेविका सविताताई दांडारे, सिद्धार्थ मेश्राम,अनिल कारकडे,दिलीप साहू,महेश चहारे,परशुराम चव्हाण,प्रकाश राणे,प्रवीण पंचबुद्धे,सिंपल उरकुंडे,सावन उईके, अजय मेश्राम ,राजेश पाटणकर,संतोष भंडारवार,रूपेश मुलकावार,अतुल बोधे आदिं मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

    सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी केले अभिनंदन! 

       जितेशदादा कुळमेथे यांनी काल हा उपक्रम शहरातील अनेक शाळेत राबविल्या बद्दल मुख्याध्यापक,शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.