निलज ग्राम पंचायत येथे आमदार अँड.आशिष जैस्वाल यांच्या हस्ते कामांचे भुमीपुजन.

 

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील निलज येथे एकुण ३ करोड ६८ लाख ३१ हजार रुपयांच्या कामाचे भुमीपुजन रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार अँड.आशिष जैस्वाल यांचे हस्ते करण्यात आले.

       यात को.प. बंधारा क्र. १ चे बांधकाम करणे रु. १५२.२६ व को.प. बंधारा क्र. २ चे बांधकाम करणे रु. १५२.२६ तसेच पुरसरंक्षण भिंतीचे बांधकाम करणे रु. ६३.७९ अशा एकुण३६८.३१ रु यांचे विविध विकास कामांचे भूमिपुजन केले.

      तसेच ग्राम पंचायत निलजच्या सभागृहात घेण्यात आलेल्या शिबीर मध्ये तयार करण्यात आलेल्या नवीन रेशन कार्डचे वाटप केले.

      याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.वैकंटेश कारामोरे,सरपंच श्री.सुनील डोंगरे,उपसरपंच श्री.गोंडेराव भुते,श्री.दीपक इंगले,माजी उपसभापती प.स.श्रीं.गजानन गजभिये,श्री.रमेश चकोले,माजी सरपंच श्री.डोमाज़ी चकोले,श्रीं.देवराव चकोले,श्री. शेषराव चकोले,श्री.दुर्योधन चकोले,श्री.अशोक हटवार,श्री. शेखर चकोले,श्री.कृष्णा कारामोरे,श्री.रामचंद्र चकोले व ग्राम पंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.