ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- भाषणकला ही केवळ वक्तृत्व नव्हे तर आत्मविश्वास, नेतृत्व आणि संवादकौशल्याचा मूलभूत पाया आहे. या कौशल्यातूनच व्यक्तिमत्त्व घडते. या उद्देशाने शिवराज्य वक्ता अकॅडमीच्या वतीने रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी २:०० या वेळेत ‘प्रभावी भाषणकला कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.
ही कार्यशाळा बौद्ध विहार, एकोडी रोड, साकोली येथे आयोजित केली असून विद्यार्थ्यांपासून ते गृहिणी, तरुण तरुणी, राजकीय व सामाजिक क्षेत्रात येण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही अनमोल संधी ठरणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये…
स्टेज फियर दूर करण्याचे उपाय,
भाषणाची तयारी व सादरीकरण,
प्रभावी संवाद व श्रवण कौशल्य,
निवेदक म्हणून कसे घडावे.
सामाजिक व राजकीय भाषण कसे करावे,
अशा विविध अंगांचा समावेश असेल,
या सेमिनारचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी वक्ते व प्रशिक्षक श्री. जितेंद्र मेश्राम सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सरांनी हजारो युवकांचे जीवन बदलले असून, त्यांचे मार्गदर्शन सहभागींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, डी. जी. रंगारी सर हे करणार आहेत.
कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्यांना बोलण्याची प्रत्यक्ष संधी, चर्चासत्रे, अनुभवकथन व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून भाषणकलेचा सराव करून घेण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमध्ये सहभाग पूर्णतः मोफत असून, मात्र पूर्वनोंदणी आवश्यक आहे.असे आवाहन शिवराज्य अकॅडमीचे प्रमुख जितेंद्र मेश्राम यांनी केल आहे.



