खल्लार येथे महसूल विभागाचे महाराजस्व अभियान.

 

युवराज डोंगरे/खल्लार

तहसिल कार्यालय,दर्यापूर अंतर्गत राजस्व मंडळ खल्लारद्वारा खल्लार येथील जि प शाळेत महाराजस्व अभियान आज २४ एप्रिल रोजी ११ते ५ या वेळेत घेण्यात आले होते.

खल्लार सर्कल मधिल खल्लार, बेंबळा बु,सांगवा बु, नालवाडा, बेलोरा, नरदोडा, कान्होली या गावातील नागरिकांसाठी हे अभियान आयोजित करण्यात आले होते.अभियानाचे अध्यक्ष नायब तहसिलदार अनिल नाडेकर होते. प्रमुख उपस्थिती मंडळ अधिकारी सुनिल जयस्वाल उपस्थित होते.

अभियानात गरजूना ७/१२, डिक्लिरेशन,संजय गांधी निराधार योजनेतील केसेस, उत्पन्नाचे दाखले, व महसूल विभागाशी संबंधित बाबींची पूर्तता करण्यात आली.

अभियान यशस्वी करण्यासाठी खल्लारचे तलाठी एस जे वसू, बेंबळा बु चे शरद दयालकर, सांगवा बु चे महेश डोरले, बेलोराचे निलेश वानखडे, नालवाडाचे सौ संगिता तायडे, नरदोडाचे कु सुजाता कडू, कान्होलीचे कु शितल सवाई तसेच सर्वच साझामधिल कोतवाल यांनी परिश्रम घेतले.