अमिर्झा येथे आयोजीत शासकिय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियानांतर्गत 8521 नागरिकांनी घेतला विविध शासकिय योजनांचा व सेवांचा लाभ….  — खासदार अशोक नेते व आमदार डॉ.देवराव होळी यांची उपस्थिती…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली, दि.24 : शासनाच्या जनकल्याणकारी योजना नागरिकांच्या दारी हा हेतु समोर ठेवून शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुकयामध्ये अमिर्झा येथे दिनांक 24 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आकांक्षित जिल्हा योजनेअंतर्गत नागरिकांचे लाभ वितरण प्रणाली तयार करण्यात आली असून सदर प्रणालीचा वापर करुन ज्या पात्र नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळला नव्हता त्या नागरिकांची यादी तयार करुन शासकीय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान गडचिरोली तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. अमिर्झा येथील अभियानाची तयारी म्हणून दिनांक 01 एप्रिलपासून नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले होते. नागरिकांनी सीएससी केंद्रामार्फत शासनाच्या विविध योजना व सेवांमध्ये 351 जातीचे प्रमाणपत्र, 2281 उत्पनाचे दाखले, 232 वय व अधिवास, 10 नॉनक्रिमीलीअर, 2894 शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, 10 संजय गांधी योजना, 33 श्रावणबाळ योजना, 678 नविन व दुय्यम रेशन कार्ड, 128 जॉबकार्ड, पीएमकिसान योजनेचे 178 नविन व दुरुस्ती करुन लाभ देण्यात आले, 13 नागरिकांना अधिकार अभिलेख देण्यात आले, राष्ट्रीय कुटुंब 4 लाभार्थी यांना लाभ देण्यात आला, 17 मतदार नोंदणी व दुरुस्ती करीता ऑनलाईन अर्ज मोफत दाखल करुन नागरिकांना मोफत लाभ वितरण करण्यात आले.

तसेच कृषी विभागामार्फत 01 टॅक्टरचे अभियानाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले, 28 नागरिकांना जन्त नाशक औषधी वाटप करण्यात आले, कामगार विभागाणे 37 नागरिकांना कामगार कार्ड वाटप केले, आरोग्य विभागाने 174 नागरिकांची आरोग्य तपासणी केली. आयुष्यमान कार्ड (Gold card) 606 बनवून नागरिकांना वाटप करण्यात आले. केंद्र शासन पुरस्कृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणारे सामाजिक सुरक्षा योजना मध्ये पीएम सुरक्षा योजना चे 339 व पीएम जीवन ज्योती योजना चे 340 अर्ज नागरिकांकडून भरुन घेण्यात आले. व सदरच्या सर्व नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात आला. तसेच ग्रामपंचायत अमिर्झा मार्फत 40 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. सामाजीक वनिकरण विभागाणे 42 नागरिकांना झाडे वाटप केली.

 मस्य व्यवसाय विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या मस्य व्यवसाय साधनावर अर्थ सहाय योजने अंतर्गत 09 नागरिकांना लाभ प्रदान करण्यात आला. तसेच 3 नागरिकांना वीज जोडणी महाराष्ट्र विद्युत वितरण विभागामार्फत देण्यात आले. कौशल्य विभाग गडचिरोली अतर्गत 08 तरुणांची कौशल्य विकास प्रशिक्षण करीता नोंद करण्यात आले. तसेच गडचिरोली उप अधिक्षक भुमि अभिलेख विभागा मार्फत 40 नागरिकांना रिनंबरींग देण्यात आले.

शासकिय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान अंतर्गत अमिर्झा येथील अभियानाला एकुण 8521 नागरिकांना लाभ देण्यात आला तसेच विविध योजनांची माहिती व जनजागृती अभियांना स्थळी करण्यात आली. शासकिय योजनांची जत्रा या कार्यक्रमांचे उद्घाटन अशोकराव नेते खासदार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र, डॉ. देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, व महेद्र गणवीर तहसिलदार, गडचिरोली यांनी केले व कार्यक्रमाची प्रस्तावना महेद्र गणवीर तहसिलदार, गडचिरोली यांनी केली. कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजने बाबत मार्गदर्शन अशोकराव नेते खासदार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र, डॉ. देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, व प्रशांत वाघरे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी केले तसेच नागरिकांना शासकिय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

  कार्यक्रमाच्या स्थळी बसवराज मास्तोळी जिल्हा कृषी अधिक्षक, गडचिरोली, डॉ. सुनिल मडावी तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली, योगेन्द्र शेंडे सहायक आयुक्त कौश्यल्य व उदयोजकता विकास केंद्र, गडचिरोली, रामरतन गोहणे व शंकर नैताम माजी पंचायत समिती सदस्य, सोनाली नागापुरे सरपंच अमिर्झा व इतर अमिर्झा मंडळातील सरपंच, तसेच इतर विभागातील तालुका स्तरीय अधिकारी उपस्थित होते.

अमिर्झा येथे आयोजीत शासकिय योजनांची जत्रा व महाराजस्व अभियान संजय मीणा जिल्हाधिकारी, गडचिरोली, व मैनक घोष उप विभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गणवीर तहसिलदार गडचिरोली यांनी नियोजन केले व दिपक गुठ्ठे निवासी नायब तहसिलदार, प्रियंका मानकर नायब तहसिलदार (नियमीत), ज्ञानेश्वर ठाकरे नायब तहसिलदार (संगायो), श्री जगदिश बारेवाड पुरवठा निरिक्षक, तसेच अमिर्झा मंडळाचे मंडळ अधिकारी मेघा कुळमेथे, मंडळातील सर्व तलाठी व कोटवार यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आला.