रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा चिमूर च्या वतीने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत सहभागी बँकेच्या खातेदार कल्पना शरद लोहकरे यांचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाल्यानतंर वारसान शरद लोहकरे यांना दोन लक्ष रु धनादेश द्वारे लाभ बँक व्यवस्थापक धम्मपाल नरवाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
केंद्र शासनाची पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना असून वार्षिक ४३६ रु. कपात करून कल्पना शरद लोहकरे ह्या लाभार्थी होत्या. त्यांचा प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वारसान शरद लोहकरे यांचेशी संपर्क करून प्रक्रिया पूर्ण केली.
दिनांक २३ फेब्रुवारी ला पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभाचा दोन लक्ष रु धनादेश शरद लोहकरे यांचे कडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अरुण लोहकरे, बँक शाखेचे कर्मचारी सुशील नन्नावरे, मंगेश टेंभूर्णे, सोनल माहेश्वरी, भूपेश हजारे, विशाल मेश्राम उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ सर्व सामान्य नागरिकांनी घेण्यात यावे.



