जे.एस.पी.एम.महाविद्यालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवस साजरा..

 

धानोरा /भाविक करमनकर 

        धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जिवनराव सिताराम पाटील मूनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा जिल्हा गडचिरोली येथे 21 ऑगस्ट 2023 रोज सोमवारला आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवसाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व माजी विद्यार्थी मंडळ द्वारा यांच्या संयुक्तपणे करण्यात आले होते. 

           कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे इतिहास प्रमुख डॉ राजु किरमिरे होते तर कार्यक्रमाचे संयोजक म्हणून डॉ पंढरी वाघ होते.

         मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी संजय पदा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भौतिकशास्त्र प्रमुख डॉ दामोदर झाडे उपस्थित होते.

           याप्रसंगी उद्यमिता दिवस आयोजित करणे विषयीची भूमिका प्रास्ताविक भाषणांमधून कार्यक्रमाचे संयोजक डॉ. वाघ यांनी स्पष्ट केली.

        आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी जीवापाड मेहनत करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न स्वाकार करावे असे विचार मांडण्यात आले.

          युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे होण्याची आवश्यकता आहे.म्हणून लोकांनी स्वरोजगार सुरू केल्यास देश लवकर आत्मनिर्भर होईल व देशाच्या विकासात भर पडेल असे विचार प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले.

         प्रमुख मार्गदर्शक व माजी विद्यार्थी संजय पदा यांनी विद्यार्थ्यांना उद्योग कसा करावा,त्यासाठी लागणारा भाग भांडवल कसे उभे करता येईल, तसेच व्यवसाय उभा करण्यासाठी आपल्या अंगी कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

            उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. अध्यक्ष भाषणामधून डॉ राजू किरमिरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना कौशल्य विकसित करावे,त्याचबरोबर उद्योग व्यवसायाची आवश्यक ती माहिती आत्मसात करावी तेव्हाच आपण उद्योगांमध्ये यशस्वी होऊ शकतो असे विचार अध्यक्षीय भाषणातून व्यक्त करण्यात आले.

           या कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी विभाग प्रमुख डॉ वाघ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वाळके यांनी मांडले.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.प्रवीण गोहणे,डॉ. संजय मुरकुटे,प्रा.मानतेश तोंडरे, प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार,डॉ.प्रियंका पठाडे व इतर महाविद्यालयीन कर्मचारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले आणि कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

         कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करण्यात आली.