रुग्णांच्या सेवेसाठी ‘आपला दवाखाना’ सज्ज… — आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

सिरोंचा: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सिरोंचा शहरात बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ जनतेसाठी कार्यान्वित झाला आहे. या दवाखान्याचा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कन्नाके,राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी,मदनय्या मादेशी, रवी रालाबंडीवार,नगरसेवक रंजित गागापूरपवार,एम डी शानु,रवी सुलतान तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        राज्यातील जनतेला सुलभ आणि परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उदास उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभर “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना” सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात विविध तालुक्यात या योजने अंतर्गत आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे.

       नुकतेच सिरोंचा शहरातील आसरअली रस्त्यावर या दवाखान्याचे उद्घाटन आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना पुरेपूर आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, पुढील काळात जनतेच्या सेवेसाठी आपला दवाखाना सज्ज असेल आरोग्य प्रशासनाने मोठ्या मेहनतीने सिरोंचा शहरात दवाखाना उभा केला आहे. या दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, महिन्यातील निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनसेवा, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, याकरिता वैद्यकीय अधिकारी अधिकारी, बहुउद्देशीय कर्मचारी, अटेंडंट, सफाई कर्मचारी या प्रकारे मनुष्यबळ कार्यरत राहणार आहेत.

बॉक्स

तालुक्यातील गोर गरीब, कामगार, मध्यम मार्गीय नागरिकांसाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे.नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा.

-आ. धर्मराव बाबा आत्राम,अहेरी विधानसभा क्षेत्र