ACC cement (अदानी समुह) तर्फे राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन योग आठवडा साजरा.

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

               २१ जुन २०२३ रोजी ACC cement उद्योग घुग्घुस येथे जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन योग आठवडा साजरा करण्यात आला. दिनांक १८ जुन पासुन ACC सीमेंट घुग्घुस समुहाच्या अधिकारी , कर्मचारी तसेच अधिकारी कर्मचारी परीवारासाठी योग प्रशिक्षण देन्यात आले . योग प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी बरेच अधिकारी कर्मचारी परीवारा सोबत शामिल झाले . योग प्रशिक्षण देण्यासाठी शिव योगा ची मुख प्रशिक्षक शिवानी रामटेके ( सर्टिफाइड ट्रेनर ऋषिकेश उत्तराखंड) , अमित वाघमारे सहकारी अश्विनी पेंदोर, दर्शना मेश्राम, ग्रंथा वाघमारे यांचा सहभाग होता . शिव योगाच्या मुख्य मार्गदर्शक शिवानी रामटेके यांनी योग फायदे सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. योग प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य सहकार्य ACC सीमेंट चे चीफ प्लांट मॅनेजर अनील कुमार गुप्ता व एच आर मॅनेजर प्रफुल पाटील तसेच त्यांचे सहकारी यांनी केले.