ब्रेकिंग न्युज… पाऊसाच्या सुरवातीलाच विज पडून बैल ठार…  — तालुक्यातील पिंपळगाव येथील घटना…

 

प्रमोद राऊत 

  प्रतिनिधी

       चिमूर तालुक्यातील मौजा पिंपळगाव येथील आनंदराव घरत यांचा बैल सकाळी वीज पडून जागेवरच ठार झाला ऐन शेतीच्या हंगामात बैल ठार झाल्याने घरत यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे 

 

     आज पहाटे विजेच्या कडकडाट मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली यावेळी पिंपळगाव परिसरात जोरदार विजेचा तांडव सुरू होता अचानक वीज गावात कोसळली सदर विजेचा धक्का आनंदराव घरत यांच्या गोठ्यात बाहेर बांधलेल्या बैलाला लागला यात बैल जागीच ठार झाला परंतु कोणतीही मनुष्यहानी झाली नाही सदर बैलाची धूर मोडल्याने घरत यांच्यावर संकट कोसळले आहे शेती कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे सदर बैलाची किंमत 50 हजाराच्या वर असल्याने घरत यांचा मोठे नुकसान झाले आहे तेव्हा प्रशासनाने सदर बाबीची दखल घेऊन बैलं मालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.