समाजकार्य पूर्णत्वास् नेण्यासाठी भाजपात प्रवेश : रमेश राजुरकर.. — उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत २५ जूनला पक्षप्रवेश.. — विधानसभा क्षेत्रातील असंख्य सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा होणार पक्षप्रवेश..

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

                समाजाचे प्रश्न सोडवितांना येणाऱ्या अडचणी राजकारणात गेल्याशिवाय पूर्णत्वास येत नाही. असा अनुभव समाजकार्य करताना आला.हे समाजकार्य भाजपच पूर्णत्वास नेऊ शकते असा विश्वास मला आल्याने मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहो. असे रमेश राजुरकर यांनी पत्र परिषद सांगितले.

        नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशाला ज्या पद्धतीने प्रगतीपथावर आणले. त्यांच्या या कार्याने मी प्रभावित झालो. मी माझ्या संस्थेद्वारे समाजकार्य करीत आहे. परंतु हे कार्य करतांना पाहिजे त्या प्रमाणात यश मिळत नाही. त्याला राजकारणाची साथ हवी म्हणून मी माझ्या समाजकार्यास शंभर टक्के न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश करीत आहो असे राजूरकर यांनी सांगितले. पक्ष प्रवेशानंतर माझ्यासमोर आगामी येणाऱ्या भद्रावती वरोरा नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणूक आहे. त्यामध्ये भाजपाला यश मिळवण्यासाठी मला माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कार्य करावे लागेल. असेही ते यावेळी म्हणाले.

     दि. २५ जून २०२३ रोज रविवारला भद्रावती येथील जैन मंदिराचे सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी आयोग हंसराज अहिर, पूर्व विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल. यावेळी विधानसभा क्षेत्रातील असंख्य सरपंच, सहकार सोसायटीचे अध्यक्ष, विविध पक्षाचे कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी चंद्रकांत गुंडावार, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे,प्रा. प्रणिता शेंडे, तुळशीराम श्रीरामे, बांगडे’ प्रवीण सातपुते, पंढरीनाथ पिंपळकर यांचे सह अनेक पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.