Home Political चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी सरपंच पदाची सोडत आरक्षणानुसार केली जाहीर…. ...

चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी सरपंच पदाची सोडत आरक्षणानुसार केली जाहीर…. — कोटगाव सर्वसाधारण,शंकरपूर सर्वसाधारण महिला तर नेरी अनुसूचित जमातीसाठी राखीव.. — कही गम कही खुशी,बघा बातमी मध्ये,सर्व गावांच्या सरपंच पदाची माहिती……..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारातील राजीव गांधी सभागृहात आज आरक्षण पदाची सोडत तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी आरक्षणानुसार जाहीर केली.

           सदर आरक्षण सोडतीनुसार काही उमेदवारांत उत्साह निर्माण झाला आहे तर काही उमेदवारांच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले आहे.

         कोटगाव गटग्रामपंचायतला सर्वसाधारण सरपंच पदाला अनुसरून सामोरे जावे लागणार आहे.यात महिला आणि पुरुष दोघांचीही वर्णी सरपंच पदासाठी लागू शकते.

       मात्र,ग्रामपंचायत निवडणूक नंतर ज्यांच्या बाडीचे बहुमत असेल त्याच बाडीचा पुरुष किंवा महिला सरपंच बनेल हे निश्चित झाले आहे.

       याचबरोबर शंकरपूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला राखीव झाली आहे.यामुळे शंकरपूर ग्रामपंचायतीचा डॉ.सतीष वारजूकर यांच्या बाजूने निकाल लागलेला असेल असे चिन्हे आहे.

        तर नेरी ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले आहे.(पुरुष/महिला)

      यामुळे नेरीला ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार की नाही हे सांगता येत नाही.

*****

    चिमूर तालुकातंर्गत सर्व ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षणानुसार यादी खालीलप्रमाणे जाहीर..‌‌.