Home Political शिवसेना नेते रविंद्र शिंदे यांनी घेतली आमदार संजय देरकर यांची भेट… ...

शिवसेना नेते रविंद्र शिंदे यांनी घेतली आमदार संजय देरकर यांची भेट… — पक्ष संघटन,पक्ष आढावा,बाबत बैठकीत झाली चर्चा…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर -आर्णी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आ.श्री.संजयभाऊ देरकर यांची त्यांच्या वणी येथील निवासस्थानी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी भेट घेण्यात आली. 

      भेटीदरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांना दिलेल्या शपथपत्राची प्रतिमा आमदार संजय देरकर यांना भेट देण्यात आली.

       यावेळी चंद्रपूर जिल्हा पक्ष संघटन,पक्ष आढावा यावर चर्चा करण्यात आली.आगामी काळात स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यप्रणाली विषयी नियोजन करण्यात आले.

         तद्वतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.