उपक्षम रामटेके/शुभम गजभिये…
मुख्य कार्यकारी संपादक/विशेष प्रतिनिधी….
नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षाचा निकाल नुकताच लागला असून या निकालानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जागा,शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात सुध्दा भ्रष्टाचारातंर्गत भेदभाव केला जात असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा 2026 च्या निवड यादीत अनेक शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी,ग्रामीण क्षेत्राच्या जागा बळकावल्यामुळे त्यांची चौकशी करण्याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी,चिमूर तहसीलदार,सिंदेवाही तहसीलदार आणि पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य तळोधी (बाळापूर) जिल्हा चंद्रपूर यांना अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवेदन दिले.
अन्यायग्रस्त ग्रामीण भागातील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना झालेली असून त्यांच्या नियमानुसार 75 टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात.
तसेच जे विद्यार्थी नगर पंचायत,नगर परिषद नगर पालीका,महानगरपालीका हद्दीतील शाळा व कॉन्व्हेंट मध्ये इयत्ता 3, 4, 5 या वर्गात शिकले आहेत किंवा शिकत आहेत त्यांची गणना शहरी विद्यार्थी म्हणून केली जाते.
असे असतांना,1) यादीतील अनुक्रमांक 25 वरील मिडीयम स्कुल चिमूर येथील नेहल महेश साखरकर,सेंट क्लॅरेट इंग्लिश,,2) यादीतील अनुक्रमांक ३० वरील युगलकिशोर योगीराज सहारे,,इयत्ता 3 व 4 सेंट क्लॅरेट इंग्लिश मिडीयम स्कुल चिमूर व इयत्ता 5 वी कॉन्व्हेंट ब्रम्हपूरी,,3) यादीतील अनुक्रमांक 8 वरील देवांशू मंगेश कामडी,देवयानी इंटरनॅशनल स्कुल,सिंदेवाही,या शहरी विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण मधून झालेली आहे.
तद्वतच सिंदेवाही तालुक्यातून एकुण 19 विद्यार्थी यादीमध्ये असून सिंदेवाही नगर पंचायत/नगर परिषद अंतर्गत,१) देवयानी इंटरनॅशनल स्कुल सिंदेवाही,२) प्राजक्ता विद्या मंदिर सिंदेवाही,३) कल्पतरू विद्या मंदिर सिंदेवाही येथील अनेक शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीण मधून निवड झालेली आहे.
म्हणूनच सत्य माहितीवरून असे लक्षात येते की,चंद्रपूर जिल्ह्याच्या शहरी विभागातील अशा किती विद्यार्थ्यांनी ग्रामीणच्या जागेचा लाभ घेतलेला आहे,याबाबत योग्य व तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
शहरी विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या शैक्षणिक सुविधा प्राप्त असून हे विद्यार्थी,जर ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयातील शिक्षणापासून दूर ठेवीत शासनाची दिशाभुल करीत असतील तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर शैक्षणिक व सामाजिक अन्याय होत आहे असे म्हणावे लागेल.
यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचे प्रमाणपत्र देत असतांना सबंधिताचे,”इयत्ता 3, 4 व 5 चे गुणपत्रक व इतर पुरावे,तसेच त्यांची शाळा कोणत्या क्षेत्रात येते याबाबत खातरजमा करूनच प्रमाणपत्र देण्याचे प्रयोजन करावे व ग्रामीण विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा,अशी नंम्र विनंती चिमूकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनाच्या प्रति माहितीस तथा उचित कार्यवाही करीता तहसिलदार,तहसिलदार सिंदेवाही,प्राचार्य पी.एम.श्री. जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा) चंद्रपूर यांना देण्यात आलेल्या आहेत.
कुमार मैत्रय दामोधर रामटेके जांभुळघाट,तह.चिमूर,कुमार शिर्ष मंगेश चाचरकर रा.पो.नेरी,तह.चिमूर,कुमारी साची मदनपाल येसांबरे रा. तळोधी (ना.),तह.चिमूर,कुमारी तनुजा सुनिल खाटे रा.तळोधी (ना.),तह.चिमूर,कुमारी सायली उमदेव गजभे रा.पो.नेरी,तह.चिमूर,कुमार महेंद्र धनराज बरसागडे या अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.
अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांना अपेक्षा आहे की,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,तहसीलदार श्रिधर राजमाने चिमूर,तहसीलदार सिंदेवाही, प्राचार्य पी.एम.जवाहर नवोदय विद्यालय तळोधी(बाळापूर) हे न्याय भुमिका घेतील आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालातंर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करतील….



