जागरण व कलश यात्रेत रामनामाने दूमदूमली कूरखेडा नगरी… — १९९२ च्या कारसेवेत सहभागी कारसेवकांचा सत्कार…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

           प्रभू श्रीरामचन्द्रांच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने शहरातील श्रीराम मंदिर परिसरात काल रात्रि जबलपूर येथील सुप्रसिद्ध भजन गायीका पूजा गूल्हाणी यांचा जागरण कार्यक्रमाचे तसेच आज सकाळी ढोल ताशा व भजनमंडळीचा निनादात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रामनामाचा गजराने शहर दूमदूमत होते.

          रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या समीती कूरखेडा यांचा वतीने रात्री भजन गायिका पूजा गूल्हाणी यांचा भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या भक्तीरसाने युक्त गाण्यासह विविध रामनामाचा महिमा मंडण करणार्या भजन व गित सादर करीत त्यानी शहर वासीयाना रामधूनात मंत्र मुग्ध केले. यानंतर खासदार अशोक नेते व आमदार कृष्णा गजबे यांचा हस्ते १९९२ मध्ये अयोध्या येथे कारसेवेत सहभागी झालेले वामरावजी फाये,देवाजी देशमुख,दिगांबर मानकर,जनार्धन लांजेवार, हरीदास सोरते यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.

       आज सकाळी येथील हनुमान मंदिर येथून ढोल ताशा व भजनाचा निनाद करीत भव्य कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रा कूंभीटोला रोड, राणाप्रताप वार्ड, मस्जिद चौक, आंबेडकर चौक बाजार पेठ,जूना बसस्थानक चौक ते नगरपंचायत कार्यालय मार्गे श्रीराम मंदिर येथे पोहचली यावेळी येथे मंदीरात सर्वानी भगवान श्रीरामाचे दर्शन घेत पूजा अर्चा केली यानंतर येथे मोठ्या स्क्रीन वर श्रीराम जन्मभूमि अयोध्या येथे भगवान राम यांचा प्रतिमेचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

         याप्रसंगी विश्व हिन्दू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष वामनराव फाये शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, ज्येष्ठ नागरिक डॉ टि एन बूद्धे,विजय झंवर, राकेश चव्हाण, गणपतराव सोनकूसरे भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे नगराध्यक्ष अनीताताई बोरकर सभापती हेमलता नंदेश्वर उपसभापति दूर्गाताई गोटेफोडे नगरसेवक रामभाऊ वैद्य नगरसेवक सागर निरंकारी प्रा. नागेश्वर फाये,रोशन कूंभलवार, उल्हास देशमुख, प्रशांत हटवार,अनिकेत आकरे,लक्ष्मन धूळसे,दामू उईके,तूषार कूथे,मोनेष मेश्राम,प्रा विनोद नागपूरकर, राहूल गिरडकर, देवेन्द्र फाये, डॉ रमेश कटरे,मून्ना महाराज, द्वारिकाप्रसाद मिश्रा महाराज, मूरलीधर देशमुख, जनार्दन लांजेवार व मोठ्या संख्येत रामभक्त मंडळी हजर होती.