दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून भाजपच्या वैजयंता उमरगेकर आणि रामचंद्र भोसले यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
महिला जागेवर भाजपच्या उमेदवार वैजयंता उमरगेकर यांनी १८६२ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले. त्यांच्या विरोधात अनुपमा नेटके यांना ३१४, योगिता नेटके यांना ११९, तर सोनू नेटके यांना २८९ मते मिळाली. तब्बल १५४८ मतांच्या फरकाने वैजयंता उमरगेकर विजयी झाल्या आहेत. त्या यापूर्वी आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षही राहिल्या असून त्यांच्या अनुभवाचा लाभ मतदारांनी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पुरुष जागेवर भाजपचे रामचंद्र भोसले यांनी १४९३ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सागर भोसले यांचा पराभव केला. सागर भोसले यांना ११४४ मते मिळाली. ३४९ मतांच्या फरकाने रामचंद्र भोसले विजयी झाले. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मतदारांचे आभार मानले.



