Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — कोटगाव येथील शाळा बांधकामासाठी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह सर्व...

ब्रेकिंग न्यूज… — कोटगाव येथील शाळा बांधकामासाठी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह सर्व पालकवर्ग निघाले,”मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्या भेटीला… — जि.प.प्रा.शाळेची इमारत खचू लागली,शाळेची इमारत निर्लेखीत,लहान शाळकरी मुले असुरक्षित,जिवितहानी होण्याची शक्यता…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

           चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर पंचायत समिती अंतर्गत मौजा कोटगाव आहे.मौजा कोटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निर्लेखीत झाली असून सदर शाळेचे खिपले विद्यार्थ्यांच्या अंगावर पडू लागली आहेत.

         तद्वतच शाळेला जागोजागी भेगा पडल्या आहेत.अशा स्थितीत मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे की शिक्षण द्यायचे हा यक्ष प्रश्न मौजा कोटगाव येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलाय.

             मुलांना शिक्षणासाठी योग्य इमारत मिळत नसेल आणि लहान शाळकरी मुलांची सुरक्षा केली जात नसेल तर प्रगत महाराष्ट्र राज्याच्या गप्पा कशासाठी मारायच्या?हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

           मौजा कोटगाव येथे प्राथमिक शाळकरी मुलांना मुलभूत शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये यासाठी मौजा कोटगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,तेथील सर्व पालक वर्ग,मौजा कोटगाव ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीला निघाले आहेत.

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटगावची इमारत खचू लागली आहे,शाळेला भेगा पडलेल्यात,यावर्षी शाळेच्या छतावर पाल टाकून विद्यार्थ्यांची कशीतरी सुरक्षा करण्यात आली.

            असे असताना मौजा कोटगाव येथील शाळा इमारतीचे बांधकाम मंजूर केले जात नाही,ही कुठली कार्यपद्धत?हा प्रश्न मौजा कोटगाव येथील नागरिकांना,ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना,पालक वर्गांना,शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

      आज चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीला मौजा कोटगाव येथील पालकवर्ग निघाला असून,मुख्य कार्यकारी अधिकारी हे मौजा कोटगाव येथील पालकांना दिलासा देतील काय? आणि शाळेचे बांधकाम सुरु करतील काय? हे काही तासातच कळेल.

      परंतु लहान मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या पालकांच्या वेदना,महाराष्ट्र प्रशासन आणि महाराष्ट्र शासन केव्हा समजून घेणार?