शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने वर्ष २०२४ मध्ये आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या असता त्या स्पर्धांत चंद्रपूर जिल्यातील सावली तालुका अंतर्गत येणाऱ्या गायडोंगरी या खेळेगावचे कवी पुनाजी नारायण कोटरंगे यांची उत्कृष्ट कवी म्हणून निवड करण्यात आली होती..
दिनांक १८ मे २०२५ रोजी नाट्यश्रीचे सर्वेसर्वा, लेखक, नाटककार, श्री. चुडाराम बल्हारपुरे सर आयोजित पुरस्कार सोहळा तसेच जत्रा घडली नागोबाची या नाट्य पुस्तकाचं प्रकाशन सोहळा तसेच कविसंमेलन सोहळा राबविण्यात आला होता.
या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अर्थातच आयोजित पुरस्कार सोहळ्यात कविवर्य पुनाजी नारायण कोटरंगे यांना उत्कृष्ट कवी हा पुरस्कार नाट्यश्रीच्या मंचावर सन्मा. डॉ. बळवंत भोयर (प्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी तथा समीक्षक नागपूर), प्रा. शाम मोहरकर (प्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी तथा समीक्षक चंद्रपूर) तसेच सन्मा. पांडुरंग सोनवणे (पोलिस निरीक्षक नागपूर) तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच तिसऱ्या सत्रात त्यांनी आपली स्वरचित कविता सादर करत उपस्थित साहित्यिक तसेच रसिकांची मने जिंकली असता प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल, सत्काराबद्दल त्यांचे आप्तजन, साहित्यिक मित्र/मैत्रीण, नातेवाईक, मित्रपरिवार, गाववासीयांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



