स्पोर्ट्स शोटोकन कराटे डू एसोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संचलित अणि ट्रेडिशनल एंड स्पोर्ट कराटे डू एसोसिएशन ऑफ चंद्रपुर द्वारा आयोजीत 15 दिवसीय समर मार्शल आर्ट कैंप संपन्न……

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्युज भारत

                  शहरी खेळाडूपेक्षा ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये शारीरिक क्षमता अधिक असते. या क्षमतेचा उपयोग करीत वर्षभर सराव करून खेळाडूंनी आंतरशालेय स्पर्धेवर लक्ष केंद्रित करावे. या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केल्यास दहावी बारावीला वाढीव गुण व शासकीय भरतीत ५% आरक्षणाचा फायदा खेळाडूंना घेता येतो असे प्रतिपादन करिकरामचे अध्यक्ष विनय पवुराला यांनी व्यक्त केले. ते शुक्रवार दिनांक 19 मे 2023 ला केसरीनंदन नगर ग्राउंड मेजर गेट टुकम चंद्रपुर येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

                यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सेंसेई लोकेश बघवा महासचिव ट्रेडिशनल एंड स्पोर्ट कराटे डो एसोसिएशन ऑफ चंद्रपुर, आणि सदस्य नेहा राचरलावार, जाहिद खान, खुशी रॉय, प्रतीक्षा टेकम, श्रद्धा जांभुळे आणि सौरभ जांभुळे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

 या शिबिरात पंधरा दिवस मार्शल आर्ट, कराटे, योगा, नृत्य, जुंबा, क्रॉसफिट, जिम्नास्टिक, मुक्केबाजी, आत्मरक्षाव, लाठी काठी चे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तसेच सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

                  या सोहळ्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह व आनंद दिसून आला.