‘ ध्यान ‘हे जीवन सफल बनवण्याची साधना-अनिल किरणापुरे  — जीवन शिक्षण शिबिराचे अवचित्य…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

          साकोली मौजा.सासरा येथे जीवन शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष देवरामजी भांडारकर महाराज प्रमुख पाहुणे गणेश आदे, सभापती, अनिल किरणापुरे पं.स.सदस्य,छाया खर्डेकर,पं.स.सदस्य, योगीराज गोटेफोडे सरपंच, माणिक खर्डेकर, दामोदर बारस्कर, तुकाराम गोटेफोडे, हेमलता मांडवकर, बिसारामजी नागरीकर, गिरधर गायधने, घनश्याम गायधने, मनीष संग्रामे, लीलाधर गोटेफोडे,वैभव गायधने व समस्त गुरूदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती सदस्य गावकरी व महिला भगिनी बालगोपाल उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी अनिल किरणापुरे म्हणाले की, दैनंदिन जीवनात ध्यानाचे अन्य साधारण महत्व आहे जीवनाच्या आचरणात ध्यानाचा पाठ हा असावा कारण ध्यान हेच जीवनात खऱ्या अर्थाने सफल बनविण्याची साधना आहे, ध्यानामुळे निराशाजनक माणसांला ऊर्जा प्राप्त होते. त्यासाठी दररोज सकाळी ध्यान नित्यनियमाने करावे.शिक्षण हे शाळेतून घेता येते पण जीवन जगण्याची कला हे शिबिरातून मिळते, आलेल्या परिस्थितीवर मात कशी करायची हे या शिबिराच्या माध्यमातून शिकायला मिळते. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हेच विचार युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिबिराचे आयोजन केले जाते. आणि शिबिरात घेतलेले ज्ञान आपल्या पुरते मर्यादित न ठेवता आपल्या गावामध्ये त्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे तरच शिबिराला योग्य रूप येईल असे ते बोलत होते.

सूत्रसंचालन वैष्णव बारस्कर, प्रास्ताविक मनीष संग्रामे, आभार बिसाराम नागरीकर यांनी केले.