प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
राष्ट्रीय स्तरावर ओबीसी जनगणना करावी या मुख्य मुद्यांसह इतर मुद्द्यांवर ओडीसा राज्यातील कटक येथे बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचे ठरले होते.सदर कार्यक्रमाला पोलिस पारवानगीसह इतर सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या.
परंतु भाजपच्या आसाम राज्य सरकारने अचानक बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केली.
बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाच्या अधिवेशनाची परवानगी रद्द करण्याचे,”मुख्य कारण म्हणजे राष्ट्रीय अधिवेशनातंर्गत ओबीसी जनगणनेचा मुद्दा हा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचू नये,याची खबरदारी भाजपाच्या केंद्र सरकारने,भाजपाच्या आसाम राज्य सरकारने आणि आर.एस.एस.ने घेतली.
अधिवेशन रद्द करणे म्हणजे भारत देशातील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर,”केंद्र,आसाम राज्य सरकार आणि आर.एस.एस.द्वारे बेकायदेशीर हातोडा चालवणे होय.जो-की मुलभूत अधिकार भांदवी कलम १९ चे उल्लंघन करणारा आहे.
यामुळे नागपूर येथील आर.एस.एस.च्या कार्यालयावर महामोर्चा काढण्याचे आयोजन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले होते.
महामोर्चाच्या आयोजनातंर्गत आज विशाल महामोर्चा नागपूर येथे वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.मात्र आर.एस.एस.प्रमुख मोहन भागवत हे त्यांचे मुख्य कार्यालय सोडून बाहेर गेले होते.
इंदोरा मैदान येथून पैदल निघालेला महामोर्चा अनेक गगनभेदी स्लोगन ने,चांगलाच महत्त्वपूर्ण ठरलाय..
महामोर्चाचे रूपांतर महासभेत झाल्यानंतर बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम महा-जनससभेला संबोधतांना म्हणाले की,”ओबीसींची राष्ट्रीय स्तरावर जनगणना होवू नये म्हणून खोट्या ओबीसीला आर.एस.एस.-भाजपाने प्रधानमंत्री बनवले आहे.
ते पुढे म्हणाले,सन दोन हजार सालापासून ओबीसींच्या जनगणनेचा मुद्दा बामसेफ ने लावून धरला आहे.आमच्यामुळे ओबीसीच्या जनगणनेचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर सन २०१३ पर्यंत अधिक मजबूत आणि गतिशील झाल्याने ओबीसींची जातीनिहाय जनगणना होवू नये म्हणूनच,आर.एस.एस.आणि भाजपाने खोट्या ओबीसीला भारत देशाचा पंतप्रधान बनविले.हे बामसेफच्या व भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे वक्तव्य धक्कादायक होते.याचा अर्थ असा की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खरे ओबीसी नाहीत.
ते पुढे म्हणाले की,भारत देशांतर्गत सार्वत्रिक निवडणुकांमधून ईव्हिएमला व ब्राम्हण सरकारला हटवलेच पाहिजे,त्या शिवाय भारत देशात ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक व इतर समाज घटकांचे देशात सरकार येणार नाही.म्हणजेच भारत देशातील मुल निवासी नागरिकांचे सरकार येणार नाही.
सध्या ईव्हिएम मशीन भाजपचेच लोक बनवतात व भाजपाच त्या ईव्हिएम मशीनचा सार्वत्रिक निवडणुकीत उपयोग करतोय.यामुळे वोट चोरी कशी करायची हे भाजपाला पक्के माहीत आहे.यामुळे भारत सरकार व अनेक राज्यांतील भाजपाचे सरकारे हे ईव्हिएम मशीन मुळे सत्तेत आहेत,असेच म्हणणे वामन मेश्राम यांचे होते..

याचबरोबर भारत देशातील जनआंदोलनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि भारत देशातील ६२५ जिल्ह्यात महाजनआंदोलनासाठी संघटन शक्ती वाढवली पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शनात भर दिला.
बामसेफ तथा भारत मुक्ति मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी महासभेला संबोधित करताना अनेक मुद्द्यांना उजाळा दिला,जे मुद्दे भारत देशातील नागरिकांना अजूनही माहित नाही.

ओबीसी समाज….
याचबरोबर सभेला संबोधित करताना राष्ट्रीय पिछडा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी म्हणाले भाजप,हिंदू संघटना,आर.एस.एस.हे या देशातील ओबीसी,पिछडा समाजाचा उपयोग फक्त मतांसाठी,चंदा वसूलीसाठी आणि मुसलमानांचा विरोध करण्यासाठी करत आहेत.
जेन्हेकरुन ओबीसी-पिछडा समाज हा आपले अधिकार जाणून घेवू नये,आपले अधिकार मागू नये,आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करु नये.
तद्वच ओबीसी पिछडा समाज केवळ ब्राम्हणांची सरकारे बनविण्यासाठी त्यांच्या पाठीमागे राहावे,हा महत्त्वाचा उद्देश भाजपा,काँग्रेस,आर.एस.एस.आणि हिंदू संघटनांचा आहे असेही चौधरी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले...
सदर महामोर्चाला अनेक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले.


