Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — झेंडेपार बंधाऱ्याच्या कामावर येणाऱ्या ट्रॅक्टर ला भिषण धडक…....

ब्रेकिंग न्यूज… — झेंडेपार बंधाऱ्याच्या कामावर येणाऱ्या ट्रॅक्टर ला भिषण धडक…. — दोन ठार, तीन जखमी…. — २५ लाख भरपाई शिवाय शव ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार…

ऋषी सहारे 

   संपादक

          कोरची तालुक्यातील मोहगाव जवळ २१ फेब्रुवारी ला सायंकाळी ५.२० च्या दरम्यान भिषण अपघात घडला.जलसंधारण विभागाच्या वतीने झेंडेपार येथे सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी सेंट्रीग  साहित्य आणत असलेल्या ट्रकटर ला त्याच दिशेने येणाऱ्या ट्रकने मागून जोरदार धडक दिली.धडकेनंतर ट्रॅक्टर उलटुन दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन लोक गंभीर जखमी झाले.

           मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील चान्दोना इथून सेंट्रीग साहित्य घेऊन ट्रकटर झेंडेपारकडे येत होता.दरम्यान मोहगाव जवळ भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

          मृतामध्ये सागर कल्लो वय 15 वर्षे रा. झेंडेपार तालुका कोरची जिल्हा गडचिरोली व कैलाश कोवे वय 35 रा. मोहगाव/ वाकडी तालुका कुरखेडा यांचा समावेश आहे.

           अपघात ईतका भिषण होता की अपघात स्थळीच दोघांचाही मृत्यू झाला.

         झेंडेपार येथे सुरु असलेले बंधाऱ्याचे बांधकाम जलसंधारण विभागाच्या अंतर्गत असून हे काम नागपूर येथील एका खाजगी कंपनीकडे आहे.शासकीय कामासाठी साहित्य वाहतूक करताना झालेल्या या अपघातामुळे प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार आहेत.त्यामुळे नातेवाईक संतापले आहेत.प्रत्येकी 25 लाख रूपये भरपाई जाहीर झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

          त्यामुळे रूग्णालय परिसरात तनावपुर्ण वातावरण तयार झाले आहे.जरी कंत्राटदार नागपूर येथील खाजगी कंपनीकडे असले तरी, हे काम दुसराच व्यक्ती करीत आहे. एरिगेशनचे इन्जिनिअर कारगुणवार यांचेशी संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

            यासंदर्भात दोघांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन कोरची येथे तक्रार दाखल केली आहे.