शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांचे गंठण दिनांक २१ जानेवारी रोजी करण्यात आले.समित्यांचे गंठण करण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात बिनविरोध पार पडली.
नगरपरिषदचे उपाध्यक्ष संजय नवघडे यांच्याकडे बांधकाम विभाग सभापती पद,नियोजन विकास विभाग सभापती गजानन चावरे,महिला व बालकल्याण विभाग सभापती कविता बाणकर,स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य विभाग सभापती कुणाल कावरे,पाणीपुरवठा व जलनिस्तारण विभाग सभापती दिगंबर बेंडे पाचही बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी चिमूर नगरपरिषदेच्या नवनियुक्ती नगराध्यक्षा गिता लिंगायत, नवनियुक्ती नगरसेवकां दुर्गा सातपुते,नवनियुक्ती नगरसेवक पराग अंबादे,श्रेयस लाखे आदींनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.



