राजस्थान मध्ये बसप करणार उलटफेर.. — पळपुटे उमेदवार स्वतःचे तोंड स्वतःच काळे करु लागले..

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

         राजस्थान मध्ये बसपचा जनाधार खूप मोठ्या प्रमाणात आहे.यापुर्वीच्या विधानसभा निवडणूकीत राजस्थानच्या जनतेंनी बसप उमेदवारांना निवडून दिले आहे.

         यावेळी सुध्दा तेथील मतदार बसपवर विश्वास ठेवून आहेत.प्रसंगानुरुप राजस्थान राज्य सत्तेची चाबी बसप शिवाय काँग्रेस व भाजपाकडे जायला नको.

           बसपा सुप्रिमो बहन मायावती यांनी राजस्थान मध्ये प्रचार सभा घेऊन तेथील राजकीय वातावरण आपल्या बाजूने केले आहे.२५ ते ३० आमदार निवडून यावेत यासाठी बसप शर्यतीचे प्रयत्न करीत आहे.

            बसपचे राजस्थान प्रदेश प्रभारी व प्रदेशाध्यक्ष भगवान सिंह बाबा हे बसप सुप्रिमो बहन मायावती यांच्या सुचनेनुसार जबाबदारी पुर्वक विधानसभा निवडणूक रणांगणात उतरले आहेत व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तागण त्यांच्या देखरेखीखाली श्रम घेत आहेत.

          बसपमुळे राजस्थान राज्यातील विधानसभा निवडणूक चुरशीची झाली असल्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बसपच्या दोन उमेदवारांनाच आपल्या झोळीत टाकले आहे.यामुळे अशोक गेहलोत यांना राजस्थानच्या राज्य सत्तेवर एकहाती पोहोचू द्यायचे नाही असे तेथील बहुजन मतदारांनी ठरवले आहे.

         बसप कडून विधानसभा निवडणूक लढणारे काही उमेदवार हे मुळचे कांग्रेस पक्षाचे असल्याने ते मधातच विधानसभा निवडणूक मैदान सोडून आपले तोंड स्वतःच काळे करीत आहेत आणि मतदारांच्या नजरेतून उतरत आहेत.

           असे पळपुटे उमेदवार बसपचे नुकसान करणार नाहीत तर ते कांग्रेस व भाजपचे नुकसान करणार आहेत असेच तेथील राजकीय वातावरण आहे.