Home Maharashtra शाळा-काॅलेज धर्मनिरपेक्ष असायला हवी… — वंचितचे पदाधिकारी विजय वाहुळकर आणि राहुल...

शाळा-काॅलेज धर्मनिरपेक्ष असायला हवी… — वंचितचे पदाधिकारी विजय वाहुळकर आणि राहुल मकासरे यांच्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे गुन्हे दाखल का म्हणून केली? — पोलिसांनी जबाबदारपणे सर्वप्रथम स्वतःचे कायदेशीर रक्षण केले पाहिजे?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

         पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी धर्मनिरपेक्षतेला महत्व देत कर्तव्याचे पालण केले पाहिजे.याचबरोबर समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुता,धर्मनिरपेक्षता आणि देशाची अखंडता लक्षात घेता,त्यांनी आपली जबाबदारी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून पार पाडली पाहिजे.

        तद्वतच अभिव्यक्तीचे महत्व व धर्म स्वातंत्र्याचे कर्तव्य काय असायला पाहिजे याची जाणीव ठेवून,पोलिस अधिकाऱ्यांनी निरपेक्ष व निष्कलंकीत कृती केली पाहिजे.

         एखाद्या सत्ता पक्षाने किंवा एखाद्या संघटनेंनी तुम्हाला अधिकारी बनवीले नाही तर भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकारी व कर्मचारी बनविले आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.

           म्हणूनच भारतातील व महाराष्ट्र राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रथमतः स्वतःचे कायदेशीर रक्षण करता आले पाहिजे.तरच ते देशातील जबाबदार नागरिकांचे व सर्व निष्पाप नागरिकांचे रक्षण करु शकतात असे म्हटले गेले पाहिजे.

             राहुल मकासरे औरंगाबाद व विजय वाहुळकर या वंचितांच्या पदाधिकाऱ्यांनी काॅलेज समोरील आर.एस.एस.नोंदणी प्रक्रियावर हरकत घेतली म्हणून त्यांच्यावर गैर जमानत गुन्हे,महाराष्ट्र पोलीस दाखल करीत असतील तर ते धर्मनिरपेक्षपणे कृती करीत नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून कर्तव्य पार पाडत नाही हे स्पष्ट आहे.

          शाळा आणि काॅलेज हि धर्मनिरपेक्ष संस्था आहेत.याठीकाणी किंवा शाळा व महाविद्यालये यापासून शंभर मीटरच्या आत कोणत्याही प्रकारची धार्मिक व अधार्मिक कृती करु नये असे स्पष्ट निर्देश आहेत…

           असे असताना,बेकायदेशीर असलेली संघटाना म्हणजे आर.एस.एस.?आणि अशा बेकायदेशीर असलेल्या आर.एस.एस.संघटनेचे पदाधिकारी हे जर शाळा व महाविद्यालयांच्या गेटच्या समोर संघटनेची नोंदणी करीत असतील आणि संघटनेच्या प्रचाराचा भाग पार पाडत असतील तर त्यांचे ते गैर जिम्मेदार व बेकायदेशीर कृत्य व कृती आहे,हे पोलिस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वेळीच का म्हणून कळत नाही? हा गंभीर प्रश्न आहे.

         वास्तविकता महाराष्ट्र पोलीसांनी शाळा व महाविद्यालये यांच्या समोर संघटनेची नोंदणी व प्रचार करणाऱ्या आर.एस.एस.पदाधिकाऱ्यांवर वेळीच गुन्हे दाखल करायला पाहिजे होती.

           मात्र,असे न करता, धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलीत,या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या कृतीला काय म्हणावे? त्यांची गैर कायदेशीर कृती की त्यांची बेजबाबदार वृत्ती? अशा बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे काय? यांचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिले पाहिजे.

             पण,संबंधित पोलिस अधिकारी स्वतःचे उत्तम व योग्य कर्तव्य पार पाण्यात चुकले आहेत असे दिसून येते आहे…हि त्यांची चूक समाजमनावर आघात करणारी आहे आणि अयोग्य मानसिकतेला वाव देणारी आहे….