प्रत्येक धर्मात सण उत्सव आहेत.दरवर्षी ते येतात आणि साजऱ्या केल्या जातात. सण म्हटला की,नवे कपडे,नवे जेवण,नवी गाणी,नवे नृत्य,नवे खेळ , नवे भजन पूजन यांचा शोध आणि आग्रह असतोच.जुन्या ऐवजी नवे हे मनाला उभारी देते.म्हणून नव्याचा शोधात आणि वापरात माणसे असतात.अर्थात हे नैसर्गिक आहे.म्हणून मान्य करावेच लागते.कारण निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही.
साऱ्या सणात दिवाळीचा सण मोठा असतो,कारण पाच दिवसाचा असतो म्हणून.शिवाय आनंदाच्या वर उल्लेखिलेल्या ज्या गोष्टी आहेत,त्यात अजून एक भर म्हणजे फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाईची आरास.यामुळे कानाचे आणि डोळ्यांचे पारणे फिटते.फटक्याने तर काणे फाटतात.म्हणूनच म्हणतात ” दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा “. हे अगदी खरच आहे.भाऊ बहिणीच्या भेटीमुळे ,आरतीमुळे,ओवाळणीमुळे तर आनंदाला अधिकच उधाण येते.नदीला पूर यावा तसा.
.रोजच्या रहाटगाड्या तून मुक्त होऊन,सुट्टी घेऊन सण साजरा केल्याने आनंद मिळतो ,खरे तर माणसाच्या जीवनातील ही एक जमेची बाजू नक्कीच आहे.परंतु यामुळे मिळणारे दुःख ही वजेची बाजू आहे,ती पण समजून घेणे जरुरीचे आहे.म्हणजे दुष्परिणाम कोणते ? हे पण पाहिले पाहिजे.कारण कोणत्याही गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम पाहणे हे शहाणपणाचे ठरते.आपण माणूस आहोत,आपणास बुद्धी आहे,तेंव्हा एखादी गोष्ट करीत असताना फायदा तोटा बघणार नाही तर मग बुद्धीचा काय उपयोग ? केवळ भावनेच्या भरात आणि रूढी परंपरा,आमच्या वाड वडिलांनी केले म्हणून आपण करावे ,असा विचार न करता ,जुन्यातील चांगले तेव्हढे घ्यावे आणि वाईट टाकून द्यावे,की जे काळानुसार ज्या गोष्टी टाकाऊ ठरल्या आहेत,किंवा कुचकामी आहेत ,किंवा आपल्या आरोग्यास,प्रगतीस बाधक आहेत,अशा गोष्टींचा त्याग करणे,हेही तितकेच महत्त्वाचे आणि शहाणपणाचे आहे.उदा.कपडे,खानपान,नृत्य,गायन,खेळ ,रोषणाई ठिक आहे,पण कान फाडतील असे आवाज,की ज्यांच्यामुळे लहान मुले , गर्भवती महिला, वृद्ध माणसे यांना त्रास होतो,रासायनिक धुरामुळे श्वसनसंस्थेवर, फुप्पुसवर दुष्परिणाम होतो, दमा असलेल्यांना गुदमरल्यासारखे होते,यामुळे सर्वांचे आरोग्य बिघडते.शिवाय हवा दूषित होते,त्यात कार्बन,मोनो ऑक्साईड,इत्यादी माणसांचे अवयव बिघडवणारे रासायनिक द्रव्य असतात,ते हवेत मिसळतात,की जी हवा माणसे घेतात.याने सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात,आणि त्यावर सरकार करोडो रुपये खर्च करते.केव्हढी ही आर्थिक नुकसान.मेंदू बिघडतो,माणसे चिडचिड करायला ,भांडायला लागतात,छोट्या छोट्या गोष्टीवरून खून करण्यापर्यंत मजल जाते,एव्हढा मेंदू बिघडण्याचे कारण दूषित अन्न, दूषित पाणी, दूषित हवा हे होय.
फटाके फोडण्याची तर आता फॅशनच झाली आहे.केवळ दिवाळीतच नव्हे तर,तुळशीचे लग्न,माणसांचे लग्न, मौत,वाढदिवस,कोणतेही लहानमोठे कार्यक्रम,मंत्री आला,निवडणूक आली तरी फटाकेच्च ,आणि मग काय सगळीकडे धुराचा कल्लोळ.सगळ्यांच्या नाकात,डोळ्यात,तोंडांत, घशात,पोटात धुरच धूर.मग रोग कसे नाही होणार ? आधीच कारखाने,मोटारी, रिक्षे यांचे धूर काय कमी आहेत ? म्हणून का त्यात ही भर टाकायची ? अरे यावर काही विचार करणार आहात का नाही ? लहान मोठे,गरीब श्रीमंत,जवान म्हातारे सारेच बिघडलेत.पण यामुळे आपणच आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहोत,याचे भान नाही.रोज मारताहेत.मेल्यावरही फटाके चालूच.आता मात्र कहर झाला.सावधान.वेळीच सुधारला नाहीत तर कुत्र्याच्या मौतीसारखे मारायची पाळी येईल.जगावरच सडून.कारण त्यावेळी मौत करायलाही माणसे असणार नाहीत.सारेच तडफडत मरताना दिसतील.
खरे तर यावर उपाय करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते.परंतु लोकशाहीत लोकं शिरजोर असतात.सरकार कमकुवत असते,लोकांवर अवलंबून असते,शिवाय भ्रष्टाचारामुळे फटाक्यांच्या कारखान्याला बंदी आणीत नाही.सरकार कठोर पाहिजे.जनहित जपले पाहिजे.” सत्य असत्याशी केली ग्वाही, मनियाले नाही बहुमता ” या तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार चालले पाहिजे.तरच हे दुष्परिणाम टळतील.प्रदूषणमुक्त जमीन,पाणी,हवा आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहिजे. खडक कायदे करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, हे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान याच्या हाती आहे.
दीपावली सण म्हणजे आनंदाचा जसा सण आहे,तसाच अंधःकार दूर करण्याचा पण सण आहे.या सणाद्वारे दिवे लाऊन रोषणाई करून आपण भौतिक अंधःकार दूर करतो,पण आतील अंधकाराचे काय ? अंतःकरणाचा अंधकार पण घालविला पाहिजे.बाहेर दिवे लाऊन जसा आपल्या भोवतालचा अंधार जसा दूर करतो,तसाच आपल्या मनातील बुद्धीतील अंधकार म्हणजे भेदभाव, अमानुषपण,दूजाभाव,अहंकार,दुर्गुण,असमानता,द्वेष,मत्सर,सुडाची भावना,कुबुद्धि, हा जो अंधकार आहे,तो घालवला पाहिजे,यासाठी एक दिवा मानवतेचा,एक दिवा ज्ञानाचा, एक दिवा एकतेचा,एक दिवा बंधुतैचा,एक दिवा न्यायचा,एक दिवा अहिंसेचा,एक दिवा प्रेमाचा,एक दिवा राष्ट्रप्रेमाचा,एक दिवा विश्वबंधुत्वाचा,एक दिवा स्वातंत्र्याचा , एक दिवा विवेकाचा,एक दिवा शीलाचा,एक दिवा करुणेचा,शेवटचा दिवा माणूस म्हणून जन्मास आल्यामुळे माणूस असल्याचा,माणुसकीचा,खरोखर मी एक हिंस्र प्राणी नसून,कोल्हा लांडगा नसून,मी माणूस जातीचा माणूस आहे,हे दर्शविणारा एक दिवा.असे काही दिवे लाऊन त्याची दीपमाळ केली तरच आतील अंधःकार दूर होईल.केवळ बाहेरील अंधकार दुरकरून अंधकार जाणार नाही.तर आतबाहेरील अंधकार नष्ट झाला पाहिजे.हेच शिक्षण ही दीपावली आपणास देत असते.


