सामान्य जनतेचा सर्वसामान्य नेता म्हणजे डॉ.सतिश वारजूकर.. — अन ते प्रत्यक्ष गेले महिला रुग्णाच्या भेटीला…

रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

           राजकारणाची आजची परीस्थीती बघता अनेक नेते राजे महाराजांच्या थाटात वावरताना दिसतात.अशा नेताच्या घरी सामान्य लोकांना प्रवेश सुद्धा दिला जात नाही.मग नेत्यांची भेट सुद्धा घेणे महाकठीण असते.

             परंतू उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ.सतिश वारजुकर हे मात्र या बाबत अपवाद आहेत.

             त्यांच्या घरी सामान्य लोकांना केव्हाही प्रवेश दिला जातो.एवढेच नव्हे येणाऱ्या प्रत्येकाची पाहुण्यासारखी सोय केली जाते.सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सर्व सामान्य जनतेला वेळ देतात व त्यांच्या समस्या जाणून घेतात.नंतर ते पुढील दौऱ्यावर निघत असतात.

         त्यामुळे डॉ.सतिश भाऊंची सर्व सामान्याच्या मनाता एक आस्थेची प्रतिमा तयार झाली आहे.

           अशातच चिमूर विधानसभा क्षेत्रातंर्गत चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक येथील सकूनबाई गजभे ह्या आजारी असून त्यांच्यावर वंजारी हॉस्पिटल ब्रम्हपुरी येथे उपचार सुरु आहेत.घरची परीस्थिती हालाकीची असून कसेतरी त्यांचेवर उपचार सुरु होते.

           तळोधी नाईक येथील कांग्रेस कार्यकर्ते आशिष कावरे यांनी सकूनबाई गजबे यांच्या आजाराबाबत व उपचारासंबंधाने डॉ.सतिश वारजुकर यांना फोन द्वारे दिली असता आज भाऊंनी ब्रम्हपुरी येथे जाऊन सकून गजभे यांची पाहणी केली व डॉक्टर वंजारी यांच्याशी चर्चा केली.कुठलीही अडचण असल्यास मला सांगा असे आश्वासन दिले.

           या वेळी चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे उपस्थित होते.