असदपूर बस स्थानक परिसरात स्वच्छता दूताची सफाई…

 

युवराज डोंगरे/ खल्लार 

    उपसंपादक

        संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत खल्लार नजिकच्या असदपूर येथील स्वच्छता दूत म्हणून गावात परिचित असलेले प्रमोद नितनवरे हे नेहमीच गावात स्वच्छता अभियान कुठलाही मोबदला न घेता नेहमीच राबवितात.

       असदपूर येथील जि.प.शाळा ,बुद्ध विहार,गावातील खाजगी शाळा परिसर, ग्रा पं, आठवडी बाजार, इत्यादी संपूर्ण परिसर स्वतः स्वच्छ करून, संपूर्ण असदपूर गावासमोर एक उत्तम उदाहरण  प्रस्तुत केले. प्रमोद  नितनवरे हे गेल्या काही वर्षांपासून निस्वार्थीपणे संपूर्ण ग्राम परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवत असतात.

         त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दाखल घेऊन असदपूर ग्रामपंचायत तर्फे १५ ऑगस्टला भव्य सत्कार करण्यात आला होता. सोबतच अचलपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सुद्धा त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच त्यांनी असदपूर येथील बस स्थानक परिसर स्वच्छ केला, त्यांच्या या कार्याची गावात नागरिकांकडून प्रशंसा केल्या जात आहे.