Home Maharashtra दर्यापुरात जन सुरक्षा विधेयकाची होळी… — काँग्रेसचे आंदोलन,कृषिमंत्र्याचाही निषेध…

दर्यापुरात जन सुरक्षा विधेयकाची होळी… — काँग्रेसचे आंदोलन,कृषिमंत्र्याचाही निषेध…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक 

         महायुती सरकारने जनसुरक्षा कायदा विधायक आणल्यामुळे त्या जनसुरक्षा विधेयकाची दर्यापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने होळी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

         विधान परिषदेमध्ये कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी मोबाईलवर पत्त्यांचा खेळ खेळल्याबद्दल त्यांचाही यावेळी निषेध व्यक्त करून सरकारचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

        सदर आंदोलन सोमवारी बस स्थानक चौकात काँग्रेस कमिटीचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांचे नेतृत्वात करण्यात आली.

        यावेळी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल गावंडे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ईश्वर बुंदिले, दर्यापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिष शिरभाते, गजानन देवतळे, प्रभाकर कोरपे,निशिकांत पाखरे, दत्ता कुंभारकर, खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष गजानन जाधव, संजय बेलोकार,अमोल देशमुख, विनोद वानखडे,बबलू कुरेशी,शिवा इंगळे,सय्यद इनामदार,बबलू कुरेशी,प्रतिक बुंदिले,सय्यद नदीम,रामेश्वर तांडेकर,मनोज बोरेकर,अक्षय माहुरे,मंगल बुंदिले,जम्मूभाई पठाण,शेख वसीम भाई,दिलीप गवई, प्रकाश चव्हाण, दादाराव इंगळे, सनाउल्ला खा, अजय ब्रदिया,देविदास काळे, अज्जू पठाण यांच्यासह इतर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.