ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम शालेय प्रांगणात घेण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्या भारती व्यास, प्रमुख उपस्थिती शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, तसेच योगप्रशिक्षक श्रीधर खराबे व वैष्णवी नंदेश्वर उपस्थित होते.
दरवर्षी २१ जूनला जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून योग दिनाचा कार्यक्रम शाळेत पार पाडला गेला. या प्रसंगी प्राचार्या भारती व्यास यांनी सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य हवा असल्यास योगा सर्वोत्तम उपाय आहे असे आपल्या प्रास्ताविकेतून सांगितले.
तसेच योगप्रशिक्षक व योग प्रशिक्षिका यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी, उर्जा शक्ती वाढविण्यासाठी, ताणतणावा पासून मुक्ती करण्यासाठी, अंर्तयामी शांततेसाठी, अंतर्ज्ञान वाढविण्यासाठी योग करण्याचे उद्देश व फायदे शाळेतील समस्त शिक्षकांना समजावून सांगूण कृतीतून करून दाखविले.
या प्रसंगी जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, सत्यजित चव्हाण, जय हरणखेडे, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे, धनंजय बोरकर, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, वैशाली भगतकर, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, स्मिता मस्के, वैशाली कोचे, अनिता धुर्वे, शालिनी धुर्वे, प्रिती फुलबांधे, मेघा संग्रामे, निलिमा हरडे, सीमा राऊत, प्रियंका झोडे, जया बडवाईक, शितल कोरे, छाया केवट, अस्मिता मस्के, निशा देवगिरकर, पल्लवी मेश्राम, संगिता जांभूळकर, शिला चव्हाण, रुपाली शेंडे, भाग्यश्री भोयर, यामिनी बोरकर आदी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



