ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
मीना गोविंदा सरोदे ही महिला मानसिक रुग्ण असून तिच्या पतीचें निधन झालेले आहेत व तिचे मूले हे गोंदियाला तिच्या सासूकडे असतात ही एकटी असते व ती घरी जात नाही रात्रीला कुठेही झोपते कोणत्या दारूच्या दुकानांमध्ये जवळ झोपते व अशी अवस्था पाहून काही लोक तिला गांजा, दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असतात हा प्रकार थांबावा महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये याची दखल वंचित बहुजन महिला आघाडीने घेतली असून त्या महिलेला जर शासकीय सुधार केंद्र ठेवला तर ती बरी होईल आणि आपल्या कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे राहील.
वंचित बहुजन महिला आघाडी च्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी वंचित बहुजन साकोली तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष शितल नागदेवे, कोकिडा रामटेके, सविता वालदे,जिजा कोल्हे ,गीता वलथरे, डी जी रंगारी, जगदीश रंगारी, यादोराव गणवीर, गणेश गजभिये,अमित नागदेवे, मोरेश्वर राऊत,व इतर महिला कार्यकर्ते व इतर वंचित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



