मंगलताई हुंडारे यांची खेड तालुका भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथील मंगलताई हुंडारे यांचे स्थानिक पातळीवरील सामाजिक क्षेत्रातील प्रभावी कामगिरी पाहून भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख डॉ.राम गावडे यांच्या समवेत नुकताच आळंदी शिवसेना महिला शहरप्रमुख मंगलताई हुंडारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कल्पना गवारी, डॉ.राम गावडे, गणेश सांडभोर, शहराध्यक्ष किरण येळवंडे, पाटीलबुवा गवारी, उपसरपंच अमोल विरकर, ज्ञानेश्वर बनसोडे, संगिता फपाळ, मीना चव्हाण, अनिता सातकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगलताई हुंडारे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यानंतर मनोगत व्यक्त करताना मंगलताई हुंडारे म्हणाल्या, “देशाचे नेते मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली हेच माझे भाग्य मी समजत होते. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला सन्मान दिला जातो हे आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. भाजप तालुकाध्यक्ष कल्पना गवारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपाध्यक्षपदी निवड करून माझी जबाबदारी वाढवली आहे. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी माझ्याकडून संपूर्ण समर्पित कार्य करण्याचा प्रयत्न करेन. आणि यामाध्यमातून पदाची आणि पक्षाची गरिमा उंचावण्यासाठी कटिबद्ध राहीन. सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून हे पद बहाल केले आहे त्याबद्दल मी आपली ऋणी आहे.”

नवनिर्वाचित खेड तालुका भाजप मोर्चा तालुका उपाध्यक्ष मंगल हुंडारे यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.