खल्लार पोलिसांची जुगारवर दोन ठिकाणी धाड,दोघांविरुध्द गुन्हा दाखल.

युवराज डोंगरे 

खल्लार/प्रतिनिधी

खल्लार पोलिसांनी दि 20 एप्रिलला पोलिस स्टेशन हद्दीतील कोकर्डा व मोचर्डा या दोन ठिकाणी धाड घालून जुगार व वरलीचे साहीत्य जप्त करीत दोघांविरुध्द खल्लार ठाण्यात गुन्हे दाखल केलेत.

 पहिल्या घटनेत कोकर्डा येथे गुप्त माहितीवरुन धाड टाकून आरोपी गजानन ज्ञानदेव कडू(55)याच्याकडून पंचसमक्ष नगदी जुगाराचे 430 व वरली मटक्याच्या चिठ्ठया असा ऐवज आढळून आला. आरोपी गजानन कडू विरुध्द मुजुका 12(अ)नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तर दुसऱ्या घटनेत मोचर्डा दिपक महादेव सुलताने हा गावात अवैध धंदे करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी मोचर्डा येथे पंचासमक्ष धाड टाकून आरोपी दिपक सुलताने याच्याकडून जुगाराचे नगदी 435 रुपये व वरली मटक्याच्या चिठ्ठया ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द मुजुका 12(अस) नुसार गुन्हा दाखल केला आहे.