शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या भक्तीभावाने झाली असून चिमूर शहरातील जौहान जावेद पठाण वय १२ वर्ष मानिक नगर या मुलांने रमजानचा पहिला रोजा उपवास ) पूर्ण केला.
इतक्या कमी वयात रमजानचा रोजा (उपवास ) ठेवल्याने या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.रमजान महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानला जातो.
या महिन्यात पहाटेपासून सुर्यास्त पर्यंत उपवास (रोजा) ठेवला जातो.नमाज पठण,कुरआन वाचन,दानधर्म आणि गरजूची मदत याला विशेष महतव असते.सयम,शिस्त,आणि आत्मशुधदीचा संदेश या माध्यमातून दिला जातो.
या मुलांनी उत्साहाने आणि श्रद्धेने पहिला रोजा ठेवत कुटुंबीयासोबत नमाज अदा केली.त्यांच्या या धार्मिक भावनेचे आणि चिकाटीचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.
वयातच चांगले संस्कार जपणारी जौहान पठाण हे इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.रमजान महिन्याच्या निमित्ताने सर्वत्र शांतता,बंधुता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे.



