Home Social दुःखद बातमी,नामांतराचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नीचे निधन… — आज अंत्यसंस्कार!

दुःखद बातमी,नामांतराचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या पत्नीचे निधन… — आज अंत्यसंस्कार!

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

     नामांतराचे प्रणेते तथा पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या पत्नी प्रा.रंजना कवाडे यांचे दुःखद निधन झाले आहे…

          त्यांचा अंत्यसंस्कार आजच सायंकाळी चार वाजता मोक्षधाम घाटरोड,नागपूर येथे होणार आहे.

      प्रा.जोगेंद्र कवाडे यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द पत्नी प्रा.रंजना कवाडे यांच्यासाठी संघर्षमय व आव्हानात्मक ठरली होती.

       त्यांच्या अकाली निधनाने प्रा.जोगेंद्र कवाळे हे एकाकी पडले असून,त्यांना पत्नीच्या अचानक निधनाने ते अतिशय दु:खी झाले आहेत.

         एका प्रणेत्याची ज्योत मालवली असल्याने सामाजिक मनात शोककळा पसरली आहे.अनेक मान्यवरांकडून प्रा.रंजना कवाडे यांच्या निधनास्तव शोक व्यक्त केला जात आहे.